गृहपाठ न करणाऱ्या विद्यार्थिनीला 168 थप्पड

झाबुआ : मध्यप्रदेशच्या आदिवासीबहुल झाबुआ जिल्हय़ाच्या एका शासकीय निवासीशाळेत 12 वर्षीय विद्यार्थिनीला गृहपाठ न केल्याने शिक्षकाकडून चुकीच्या प्रकारे शिक्षा देण्यात आल्याचे प्रकरण समोर आले. शिक्षेच्या स्वरुपात वर्गातील विद्यार्थिनींकडूनच 6 दिवसांपर्यंत तिला 168 थप्पड लगावण्यात आल्या.
विद्यार्थिनीच्या वडिलांनी याची तक्रार प्राचार्यांकडे लेखी स्वरुपात केली आहे. जिल्हा मुख्यालयापासून 34 किलोमीटर अंतरावरील थांदला तहसील मुख्यालयात स्थित जवाहर नवोदय वस्तीशाळेत 6 वीच्या वर्गातील विद्यार्थिनी अनुष्काचे वडिल शिवप्रताप सिंग यांनी घटनेची तक्रार नोंदवली. अनुष्का मागील काही दिवसांपासून आजारी असून उपचारासाठी तिला दररोज रुग्णालयात न्यावे लागत होते. यामुळे तिला गृहपाठ पूर्ण करता आला नसल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)