गृहपाठ झाला नाही म्हणून सहावीच्या विद्यार्थ्याने सोडले घर

विरार : शाळेचा गृहपाठ झाला नाही म्हणून विद्यार्थ्याने घर सोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रुद्र सत्यप्रकाश शर्मा असे या सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव आहे. शाळेचा गृहपाठ झाला नाही म्हणून शिक्षक ओरडतील आणि घरी थांबल्यास आई-वडील मारतील या भीतीने रुद्रने घर सोडण्याचा निर्णय घेतला.

रुद्र कांदिवलीच्या पोयसर परिसरात राहतो. घर सोडल्याचा विचार केल्यानंतर त्याने पायी कांदिवली स्टेशन गाठलं. कांदिवली स्टेशनला पोहोचल्यानंतर त्याने विरार गाडी पकडून विरारला पोहोचला. विरार रेल्वे पोलिसांना आरक्षण तिकीट हॉलच्या सीसीटीव्हीमध्ये रुद्र स्टेशनवर एकटा फिरताना आढळला. त्यांच्या संशयी हालचाली ओळखून पोलीस त्याच्याकडे गेले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलिसांनी चौकशी केल्यानंतर रुद्रने सर्व हकीकत पोलिसांना सांगितली. पोलिसांनी रुद्रकडून त्याच्या पालकांचा मोबाईल नंबर घेतला आणि त्याच्या पालकांना विरारला बोलावून घेतलं. त्यानंतर रुद्रला त्याच्या पालकांकडे सोपवण्यात आलं. विरार स्टेशनवरील पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)