गृहनिर्माण संस्थांना जागा मिळणार मालकी हक्काने

रेडीरेकनरच्या 25 टक्‍के रक्‍कम अधिमूल्य म्हणून भरावी लागणार

पुणे – राज्य शासनाने कज्बेहक्काने (भोगवटादार वर्ग 2) दिलेल्या जागेवर उभ्या राहिलेल्या गृहनिर्माण सोसायट्यांना शुल्क आकारून मालकी हक्काने त्या जागा करून देण्यास सरकारने मान्यता दिली आहे. मात्र, त्यासाठी संबंधित व्यक्तीला रेडीरेकनरच्या 25 टक्‍के इतकी रक्‍कम अधिमूल्य म्हणून भरावी लागणार आहे.

-Ads-

गृहनिर्माण संस्था स्थापन करून अशा संस्थांना गृहनिर्माण प्रकल्प उभारण्यासाठी राज्य सरकारकडून जागा उपलब्ध करून दिल्या जात होत्या. 1966 पासून जागा राज्य सरकारकडून सोसायट्यांना देण्यात येत आहे. या जागा उपलब्ध करून देताना त्यांच्याकडून कब्जेहक्कापोटी अल्प शुल्क आकारले जात होते. शहरात बिबवेवाडी, शिवाजीनगर, वारजे, सहकारनगर अशा अनेक भागांत या सोसायट्या उभ्या राहिल्या आहेत. त्यांनी कब्जेहक्काची रक्‍कम भरली असली, तरी अशा जागांची मालकी शासनाकडे होती. त्यामुळे गृहप्रकल्पांचे पुनर्विकास अथवा प्रकल्पातील सदनिकांची विक्री करताना तेथील रहिवाशांना जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागत असे.

ही सर्व प्रक्रिया किचकट असल्यामुळे शहरातील अशा सोसायट्यांचा पुनर्विकास खरडला होता. तसेच या सोसायट्यांखालची जागा मालकी हक्‍काने करून द्यावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून तेथील रहिवाशांची होती. अखेर राज्य सरकारने त्या संदर्भात निर्णय घेतला आहे. रेडीरेकनरमधील जमिनीच्या दराच्या 25 टक्‍के शुल्क भरल्यानंतर या जमिनी सोसायट्यांना मालकी हक्‍काने करून मिळणार आहेत. त्यामुळे त्यांचे पुनर्विकास करणे अथवा त्यातील सदनिकांची खरेदी-विक्री करताना जिल्हाधिकारी यांची परवानगी घेण्याची गरज नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
1 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)