गृहकर्जासाठी बँक गॅरंटी (भाग-१)

बॅंकांनी सुलभ गृहकर्जाच्या कितीही जाहिराती केल्या, तरी गृहकर्ज घेणे सोपे नसते. मुख्य म्हणजे, बॅंकेला तारण किंवा गहाण म्हणून देण्यासाठी मालमत्ता असावी लागते किंवा बॅंक त्यासंदर्भात करार करून घेते. ही प्रक्रिया सर्व बॅंकांची वेगवेगळी असते. तसेच कर्जदाराची सांपत्तिक परिस्थिती, मालमत्तेचा प्रकार यानुसारही प्रक्रिया बदलू शकते; परंतु गॅरंटी असल्याखेरीज गृहकर्ज मिळत नाही.

घर खरेदी करण्यासाठी बहुतेकांना होमलोन घ्यावे लागते. “गृहकर्ज घेणे झाले सोपे,’ किंवा “सोपी कागदोपत्री कार्यवाही,’ किंवा “कोणत्याही छुप्या अटी नाहीत’ अशा कितीही जाहिराती आपल्या पाहण्यात येत असल्या तरी त्यामुळे संबंधित बॅंकेकडे किंवा वित्तसंस्थेकडे आकर्षित होण्यात काहीच हशील नसतो. अशा जाहिरातींचे आकर्षण वाटणे स्वाभाविक असले आणि जाहिरातीत केलेले दावे कितीही मोठे असले तरी गृहकर्ज मिळविणे कोणत्याही परिस्थितीत सोपे नसते, हे लक्षात घेतलेले बरे. साधा विचार आहे, जर बॅंक आपल्याला मोठ्या रकमेचे कर्ज घर खरेदीसाठी देत असेल, तर ती आपले स्वतःचे व्यावहारिक आणि व्यापारी हित जोपासणारच. तसेच आपण कर्जाऊ देत असलेली रक्कम सुरक्षित राहील याचीही हमी बॅंक घेणारच. त्यामुळेच बॅंका कर्ज देताना गॅरंटी म्हणून कोणतीतरी मालमत्ता आपल्याकडे तारण म्हणून घेतात. त्याद्वारे बॅंक कर्जाऊ दिलेल्या रकमेची सुरक्षितता निश्‍चित करते. जर कर्ज घेणाऱ्या व्यक्तीने बॅंकेचे हप्ते किंवा व्याज दिले नाही, तर अशा वेळी गहाण ठेवलेली मालमत्ता हेच बॅंकेच्या हाती असलेले एकमेव शस्त्र असते. या मालमत्तेतूनच बॅंक आपल्या कर्जाची वसुली करून घेते. त्याचप्रमाणे ज्या घराच्या खरेदीसाठी कर्ज दिले जात आहे, त्या घराची किंमत कर्जाऊ दिलेल्या रकमेपेक्षा अधिक असेल, याचीही काळजी बॅंक घेते. मालमत्ता गहाण ठेवण्याचा अर्थ ती बॅंकेकडे “हायपोथिकेशन’ स्वरूपात ठेवणे असा आहे.

गृहकर्जासाठी बँक गॅरंटी (भाग-२)

-Ads-

कर्जासाठी बॅंका आणि वित्तसंस्थांचे नियम आणि अटी-शर्ती एकमेकांपेक्षा भिन्न असतात. कर्जाऊ द्यावयाची रक्कम, मालमत्तेची किंमत, ग्राहकाची आर्थिक परिस्थिती यावरही काही नियम अवलंबून असतात. सामान्यतः मालमत्तेच्या मालकाकडून मालकी हक्काचे कागदपत्र बॅंकेत जमा करावे लागतात. या प्रकारात अन्य कोणतीही प्रक्रिया करण्याची गरज भासत नाही. मालमत्ता गहाण ठेवण्याची ही सर्वांत सोपी पद्धत आहे.

– विनिता शाह


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)