गृहकर्जासाठी बँक गॅरंटी (भाग-२)

बॅंकांनी सुलभ गृहकर्जाच्या कितीही जाहिराती केल्या, तरी गृहकर्ज घेणे सोपे नसते. मुख्य म्हणजे, बॅंकेला तारण किंवा गहाण म्हणून देण्यासाठी मालमत्ता असावी लागते किंवा बॅंक त्यासंदर्भात करार करून घेते. ही प्रक्रिया सर्व बॅंकांची वेगवेगळी असते. तसेच कर्जदाराची सांपत्तिक परिस्थिती, मालमत्तेचा प्रकार यानुसारही प्रक्रिया बदलू शकते; परंतु गॅरंटी असल्याखेरीज गृहकर्ज मिळत नाही.

गृहकर्जासाठी बँक गॅरंटी (भाग-१)

दुसऱ्या पद्धतीत कर्ज घेणाऱ्या व्यक्तीला संबंधित संपत्ती आपण बॅंकेकडे गहाण ठेवत आहोत, अशा आशयाच्या दस्तावेजावर स्वाक्षरी करावी लागते. जर कर्जदाराने कर्जाची रक्कम भरली नाही, तर या दस्तावेजाचा उपयोग बॅंक वा वित्तसंस्था करते. तिसरी पद्धत “इंग्लिश मॉरगेज’ या नावाने ओळखली जाते आणि ती अधिक सुरक्षित पद्धत मानली जाते. या पद्धतीत कोणतीही कागदपत्रे गहाण ठेवण्याची गरज नसते. कर्ज घेणारी व्यक्ती आणि बॅंक यांच्यात एक करार केला जातो. हा करार मुद्रांकावर केला जातो आणि त्याची नोंदणी करवून घेतली जाते. ही प्रक्रिया महागडी आहे. कारण नोंदणीचा खर्च आणि मुद्रांकाचा खर्च या प्रक्रियेसाठी करावा लागतो. हा खर्च कर्ज घेणाऱ्या व्यक्तीलाच भरावा लागतो. या प्रक्रियेअंतर्गत कर्जदार संबंधित मालमत्ता बॅंकेच्या नावावर ट्रान्सफर करतो. हा करार कर्जाची परतफेड झाल्यानंतर कर्जदाराला परत दिला जातो.

गृहकर्ज घेताना तारण म्हणून ठेवल्या जाणाऱ्या मालमत्तेबाबत काही कायदेशीर बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत. मालमत्ता गहाण ठेवल्यानंतर ती मालमत्ता मालक कुणालाही विकू शकत नाही. त्यामुळे कोणतीही मालमत्ता खरेदी करण्यापूर्वी ती कुठल्या बॅंकेकडे गहाण तर नाही ना, याची शहानिशा केली जाते. ही माहिती उपनिबंधक कार्यालयात गेल्यास मिळू शकते. जर एकाच मालमत्तेच्या गहाणखतावर एकापेक्षा अधिक बॅंकेकडून कर्ज घेतले असेल, तर कर्ज थकल्यास दोन्ही बॅंका मालमत्तेतील आपापला वाटा घेऊन कर्जाची रक्कम वळती करून घेतात.

– विनिता शाह


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)