गूढ शेली आयलॅंडचे

संशोधन ही अव्याहतपणाने सुरू असलेली आणि चालणारी प्रक्रिया आहे. पृथ्वीची निर्मिती कशी झाली याबाबत अनेक मतमतांतरे असली तरीही पृथ्वीवरील असंख्य गूढ गोष्टींचा शोध आजही लागलेला नाही याबाबत मात्र एकमत आहे. पृथ्वीच्या पाठीवर अनेक रहस्यमय ठिकाणे आहेत. त्या ठिकाणांना विशिष्ट पार्श्‍वभूमी आहे. त्याचप्रमाणे त्या ठिकाणांबाबत काही दंतकथाही प्रचलित आहेत. काही प्रसंग असे घडतात की या दंतकथांमध्ये तथ्य आढळून येते.

गूढ, रहस्यमय ठिकाणांबाबत पृथ्वीवर सर्वांत सुप्रसिद्ध असणारा भाग म्हणजे अटलांटिक महासागरातील “बर्म्युडा ट्रॅंगल’ नावाने ओळखला जाणारा विशेष त्रिकोणीय भाग. बार्बाडोस, फ्लोरिडा आणि प्युर्टो रिकोदरम्यानच्या या पाच हजार किलोमीटरच्या पट्ट्यात गेल्या शंभर वर्षांत 75 विमानं आणि 100 हून अधिक जहाजं बेपत्ता झाली आहेत. विशेष म्हणजे या विमान किंवा जहाजांचे अवशेषही कधी सापडू शकलेले नाहीत. या बर्म्युडा ट्रॅंगलचे रहस्य काही महिन्यांपूर्वी उलगडलं असं वाटत असतानाचयासंबंधीची आणखी एक गोष्ट समोर आली आहे.

उत्तर कॅरोलिनामध्ये केप पॉईंटजवळ एक बेट तयार झाले असून स्थानिकांनी या गूढ बेटाला “शेली आयलॅंड’असे नाव दिले आहे. हे नवे बेट पूर्णपणे शिंपल्यांनी आच्छादलेले आहे, म्हणून स्थानिकांनी या बेटाला “शेली आयलॅंड’ म्हणण्यास सुरुवात केली आहे. बेट पाहण्याचं कुतूहल लोकांमध्ये निर्माण झाले आहे. मात्र, या बेटाच्या जवळ न जाण्याचं आवाहन लोकांना करण्यात आले आहे. या ठिकाणी लोकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो तसेच या भागात शार्क आणि स्टिंग रे देखील असल्याने ते हल्ला करू शकतात, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे.

ऑक्‍टोबर महिन्यात बर्म्युडा ट्रॅंगल विषयी रहस्य उघड करण्यात आले होते. अटलांटिक महासागरातील या पट्ट्यात षटकोनी ढगांची निर्मिती होऊन एअरबॉम्ब तयार होतात. यासोबत 170 मैल प्रति तास या वेगाने वाहणारे वारेही असतात. या फेऱ्यात अडकून जहाजं बुडू शकतात आणि विमानंही समुद्रात पडण्याची दाट शक्‍यता असते, असा निष्कर्ष संशोधकांनी काढला होता, पण आता बर्म्युडा ट्रॅंगल भागात तयार झालेल्या या नवीन बेटामुळे शास्त्रज्ञांना पुन्हा एकदा संभ्रमात टाकले आहे!


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)