गुवाहाटी विमानतळावर गर्भवती महिलेचे कपडे उतरविले

नवी दिल्ली : गुवाहाटी विमानतळावर एका गर्भवती महिलेचे कपडे उतरवून झडती घेण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला. यासंबधी महिलेच्या पतीने सीआयएसएफकडे तक्रार दाखल केली आहे.

गर्भवती महिलेचा पती शिवम सरमाह यांनी ट्विटरच्या माध्यमातून सीआयएसएफकडे तक्रार केली आहे. ते म्हणाले की, गर्भवती महिलांसोबत कसे वागावे हे सीआयएसएफला शिकले पाहिजे. सुजाता नावाच्या एका सीआयएसएफच्या कर्मचा-याने माझ्या पत्नीला गर्भवती आहे की नाही हे पाहण्यासाठी तिला जबरदस्तीने कपडे उतरवण्यास भाग पाडले. या देशात गर्भवती असणे गुन्हा आहे का? असा सवाल शिवम सरमाह यांनी केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ही घटना 24 जूनला गुवाहाटी येथील गोपीनाथ बोर्डोलोई आंतरराष्ट्रीय विमातळावर घडली. गर्भवती महिला गुवाहटीहून दिल्लीला येत होती. दरम्यान, शिवम सरमाह यांच्या ट्विटनंतर सीआयएसएफने या घटनेची चौकशी सुरु केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)