गुवाहाटी येथील पान बाजार परिसरात ब्लास्ट, 4 लोक गंभीर जखमी

आसाम – गुवाहाटी येथील पान बाजार परिसरात आज दुपारच्या सुमारास धमाका झाला. या ब्लास्टमध्ये 4 लोक गंभीर स्वरूपात जखमी झाले आहेत. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन सदर परिसर सील केला आहे. तसेच ब्लास्टमध्ये गंभीर स्वरूपात जखमी झालेल्या लोकांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


प्राप्त माहितीनुसार, हा ब्लास्ट शुक्लेश्वर घाट जवळील पान बाजार येथे झाला आहे . घटना स्थळी विटांचे तुकडे पडलेले दिसून आले आहे. ब्लास्टच्या आवाज होताच परिसरात खळबळ उडाली. स्थानिक लोकांनी आपली दुकाने बंद केली. दरम्यान पोलिसांनी घटना स्थळी वेळेत  पोहचून परिस्थिती नियंत्रणात आणली. तसेच स्थानिक नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नका असे पोलिसांनी सांगितले.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)