गुळूंचेत दिपउत्सावाने उजळले ज्योतिर्लिंग मंदिर

नीरा- नुकतीच काटेबारस यात्रा साजरी करण्यात आलेल्या गुळूंचे येथील ज्योतिर्लिंग मंदिर परिसरात गुरुवारी (दि. 22) सायंकाळी दिपप्रज्वलीत करून त्रिपुरारी पौर्णिमा साजरी करण्यात आली. गुळुंचे (ता. पुरंदर) येथील प्रसिद्ध ज्योतिर्लिंग मंदिर परिसरात पंचवीशे पंचवीस दिप प्रज्वलीत करून दिपोत्सव साजरा करण्यात आला. नियमित आरतीच्या वेळी दिप लावल्याने भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. यासाठी यात्रा कमेटीचे पंच, जिर्णोद्धार समितीचे सदस्य, युवक व युवतींनी परिश्रम घेतले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)