गुळुंचेत जिल्हा बॅंकेची शाखा सुरु करा

नीरा- पुणे जिल्हा सहकारी बॅंकेची शाखा गुळुंचे गावात सुरु करण्याची मागणी गुळुंचे येथील नागरिकांनी केली आहे. गुळुंचे (ता. पुरंदर) येथील गुळुंचे विविध कार्यकारी सोसायटीची वार्षिक सभा नुकतीच पार पडली. त्यामध्ये ही मागणी करण्यात आली.
ग्रामस्थांना आर्थिक व्यवहारांसाठी पाच किलोमीटर अंतरावर नीरा गावात ठिकाणी जावे लागते. गावातील अनेक ज्येष्ठ नागरिकांची जिल्हा मध्यवर्ती बॅंकेत खाती आहेत. गावात शाखा सुरु झाल्यास याचा फायदा गावातील जेष्ठांसह ग्रामस्थ व परिसरातील वाड्या-वस्त्यांवरील लोकांना होऊ शकेल. तसेच ज्येष्ठ नागरिक, पेंशनधारक, महिला, विद्यार्थी यांना आर्थिक व्यवहार करण्यासाठी करावी लागणारी धावपळ कमी होऊ शकते. त्यामुळे गावात शाखा सुरु करण्याबाबत सोसायटीच्या सभेत प्रा. राजेंद्र निगडे यांनी विषय ठराव मांडला. त्याला सभासद कांचन निगडे यांनी अनुमोदन दिले. याविषयी गुळुंचेचे उपसरपंच शितल निगडे यांनी सांगितले की, गावात दोन सोसायट्या असून पुरेशी लोकसंख्या आहे. याविषयी ग्रामसभेत चर्चा करण्यात येईल. त्याप्रमाणे योग्य तो पाठपुरावा केला जाईल..
गावात सोसायटीच्या इमारतीसाठी मोफत जागा देण्याचे आश्वासन संचालक राजेंद्र निगडे यांनी दिले. यावेळी संचालक शिवाजी निगडे, वसंत निगडे, गोरख निगडे, धनंजय निगडे, संतोष गायकवाड आदी उपस्थित होते. प्रास्ताविक जालिंदर निगडे यांनी केले.

  • गुळुंचे ग्रामपंचायत व दोन्ही सोसायटींच्या शाखा सुरू करण्याचे प्रस्ताव आला की नाबार्डच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करुन तात्काळ निर्णय घेतला जाईल. गावोगावी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या जास्तीत जास्त शाखा सुरू करून लोकांपर्यंत तत्पर सेवा देण्यात येत आहेम.
    – रमेश थोरात, अध्यक्ष, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)