गुळवेलकर हिला इटलीतील शिष्यवृत्ती

पिंपरी – थेरगाव येथील सुरभी गुळवेलकर या विद्यार्थीनीला “द फ्लॉरेन्स ऍकॅडमी ऑफ आर्ट’ या इटलीतील नामांकीत संस्थेची शिष्यवृती नुकतीच जाहीर झाली. भारतामधून निवड झालेली सुरभी ही एकमेव चित्रकार आहे.

इटलीतील मानाच्या समजल्या जाणाऱ्या “द फ्लॉरेन्स ऍकॅडमी ऑफ आर्ट’ या संस्थेकडून एप्रिल 2017 मध्ये जागतिक पातळीवरील “समर स्कॉलरशीप कॉन्टेस्ट’ आयोजित केली होती. या स्पर्धेत व्यक्‍तिचित्रण कला प्रकारात सुरभीने दुसरा नंबर पटकवला. या शिष्यवृतीमुळे ऑकॅडमीमध्ये एक महिन्याचे विशेष प्रशिक्षण घेण्याची संधी सुरभीला मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)