गुल पनागचे मोबाइल वेड सुटता सुटेना

गुल पनाग सध्या बॉलीवूडमध्ये विशेष अॅक्‍टिव्ह नाही. त्यामुळे तिचे नावही चर्चेत येत नाही आहे. पण तिचे नाव एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहे. तिला सध्या मोबाइल फोनचे व्यसन जडले आहे. सदानकदा ती मोबाइलवरच अॅक्‍टिव्ह असते. तिला तिचे हे व्यसन सोडायचे आहे. त्यासाठी तिला खूप खटाटोप करावा लागतो आहे. मात्र, काही केल्या तिच्या हातातून हा मोबाइल काही सुटत नाही आहे.

गुल पनागने मंगळवारी इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला. त्यात ती मोबाइलवर ऑनलाइन चॅट करताना दिसते आहे. या मोबाइलपासून कशी सुटका करू, असा प्रश्‍नही तिने स्वतःच विचारला आहे. मोबाइलची सवय सोडण्याची पहिली पायरी म्हणजे आपल्याला मोबाइलचे व्यसन आहे, हे मान्य करणे आहे. ही गोष्ट तिने मान्य केली आहे. म्हणूनच आता हे व्यसन कसे सोडवायचे याचा शोध ती घेते आहे.

-Ads-

वर्क फ्रंटच्या बाबतीत बोलायचे तर काही दिवसात गुलचा “बायपास रोड’ येतो आहे. त्यात ती नील नितीन मुकेशबरोबर दिसणार आहे. गेल्या तीन महिन्यांपासून त्याचे शुटींग अलिबाग आणि लोणावळ्यात सुरू होते. बऱ्याच दिवसांनी गुल पनागचा सिनेमा येतो आहे. त्यामध्ये ती निगेटिव्ह रोल साकारणार असल्याचेही समजले होते. एवढेच नव्हे तर करण जोहरच्या “स्टुडंट ऑफ इयर 2’मध्ये ती स्पोर्टस कोचच्या रोलमध्ये दिसणार असल्याचे समजले होते.

तिच्या करिअरमध्ये तिने खूप उतार चढाव बघितले आहेत. सुरुवातीला मॉडेलिंग, मग अभिनय करणाऱ्या गुलने आपल्या करिअरच्या प्रारंभीच्या काळात पायलटचे प्रशिक्षणही घेतले आहे. तिच्याकडे पायलटचे लायसेन्सही आहे. एवढेच नव्हे तर 2014 च्या लोकसभा निवडणुकीत “आप’कडून तिने निवडणूकही लढवली होती. पण भाजपच्या किरण खेरकडून तिचा पराभव झाला होता. मध्यंतरी तिने आपल्या नवीन संसारावर लक्ष केंद्रित केले होते. आता मातृत्वाची सुट्टी एन्जॉय केल्यावर आणि एका गोड मुलाची आई झाल्यावर गुलने आपला मोर्चा पुन्हा एकदा अॅक्‍टिंगकडे वळवला आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)