गुलाब, गुलछडीचे भाव वधारले

पिंपरी – श्रावण महिन्याला सुरूवात झाली असून, फुलांची आवक वाढली असुन, भावात वाढ झाली आहे.

परिणामी फुलबाजारात तेजीचे वातावरण आहे. गुलाब व गुलछडीचे भाव वधारले आहेत. अन्य फुलांचे देखील भाव किंचित वधारले आहेत. याशिवाय सत्यनारायण पूजेकरिता केळीचे खुंट, तुळस पाने, दुर्वा व विड्याच्या पानांना मागणी वाढली आहे. श्रावण महिन्यामुळे बाजारात ही तेजी कायम राहण्याची शक्‍यता फुलविक्रेत्यांनी वर्तविली आहे.

फुलांचे दर प्रतिकिलो व बंडलनुसार पुढीलप्रमाणे- झेंडू (साधा, पिवळा व कोलकत्ता)-30 ते 50 रुपये, कापरी-60 ते 80 रुपये, गुलछडी-120 ते 150 रुपये, लिली बंडल- 8 ते 10 रुपये, जरबेरा बंडल- 60 ते 80 रुपये, जुई बंडल- 200 ते 250 रुपये, गुलाब गड्डी (साधा)- 20 ते 30 रुपये, गुलाब गड्डी (डच)- 60 ते 80 रुपये, बिजली- 120 ते 160 रुपये, अष्टर चार गड्डी- 12 ते 16 रुपये, कागडा बंडल- 220 ते 250 रुपये, तुकडा गुलाब (डच ) 120 ते 160 रुपये किलो. किरकोळ बाजारात कागडा गजऱ्याचा प्रति नगाचा भाव 10 रुपये आहे.तर 100 रुपये डझन याप्रमाणे विक्री होत आहे. याशिवाय सत्यनारायण महापुजेसाठी केळीचे खुंट, तुळस पाने, दुर्वा आणि विड्याच्या पानांचा कॉम्बो पॅक 80 रुपयांना उपलब्ध आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)