गुलाबी पंखांच्या पाहुण्यां अभावी उजनी सुनेसुने

  • मुबलक पाणी अन्‌ खाद्य असूनही तुरळकच फ्लेमिंगोंचे आगमन : पर्यटकांची घोर निराशा; इतर पक्ष्यांची मांदियाळी

नारायण मोरे
भिगवण – उजनी जलाशयात असलेला उथळ पाण्याचा साठा अन्‌ खायला मुबलक खाद्य मिळत असल्याने उजनी जलाशयाच्या भागात दरवर्षी विणीच्या हंगामासाठी (अंडी घाण्याचा काळ) परदेशी पाहुणे अर्थात रोहित उर्फ फ्लेमिंगो यांच्यासह विविध प्रजातींचे पक्षी येत असतात मात्र, यंदा बोटावर मोजण्या इतकेच परदेशी पाहुण्यांचे आगमन झाले असल्याने पर्यटकांची निराशा होत आहे. मात्र, इतर पक्ष्यांची मांदियाळी असल्याने पर्यटकांना थोडासा दिलासा मिळाला आहे.
भिगवण ते कांदलगाव या उथळ पाण्याच्या परिसरात ऑक्‍टोबर-नोव्हेंबरमध्ये थंडीची चाहूल लागली की, रोहित पक्षांचे थवेच्या थवे उत्तर सैबेरिया, युरोप व अमेरिका खंडाच्या भागातून आशिया खंडात स्थलांतरीत होत असतात, इंदापूर तालुक्‍यातील परिसराच्या पाणवठ्यावर फ्लेमिंगोसह अनेक शेकडो जातीचे समुद्री पक्षी हजारोंच्या संख्येने याठिकाणी दाखल होत असतात भिगवण, डिकसळ, कोंढार चिंचोली, डाळज, कुंभारगाव, पळसदेव आदी भागात मोठ्या प्रमाणात पक्षांचे आगमन होते, त्यामुळे या गावांतील उजनी जलाशयावर होडीच्या साहाय्याने जाऊन पक्षीपाहण्यासाठी पर्यटकांना दरवर्षी ही एक पर्वणीच असते.
उजनी जलाशयावरील नदीकाठील गावे अलीकडच्या काळात पर्यटकांसाठी पर्यटन स्थळे म्हणून चांगलीच परिचित झाली आहे. थंडीच्या दिवसांत उजनी जलाशयावर आंनद लुटण्यासाठी पुणे, सोलापूर, नगर आदी जिल्ह्यांबरोबर राज्यातील,राज्याबाहेराहून देखील अनेक पर्यटक, पक्षी अभ्यासक याठिकाणी येत असतात यामुळे या परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी दिसते. शेकडो जातीचे समुद्री पक्षी,चित्रबलाक तर सर्वांत उठून, मनमोहक दिसणारे अग्निपंख नावाने ओळखले जाणारे फ्लेमिंगो या पक्षांच्या लयबद्ध हालचालींमुळे जलाशयाच्या काठी जणू स्नेहमेळाच भरल्याचा भास होतो त्यामुळे हे विहंगमदृष्य टिपण्यासाठी हौसी पर्यटकांची उजनी जलाशयाकडे धाव असते. सध्या पक्षांचे आगमन होण्याचा कालावधी संपूनदेखील ते अद्याप न आल्याने पर्यटकांची घोर निराशा झाली आहे.

  • हवामान बदलाचा परिणाम?
    हवामानाच्या बदलामुळे ऑक्‍टोबर-नोव्हेंबर या कालावधीत इराण, राजस्थान, गुजरातसह, युरोप खंडातील भागांतून पक्षी महाराष्ट्रातील या भागांत स्थलांतर करतात काही अभ्यासकांच्या मते या कालावधीत त्या परदेशाच्या तुलनेत या भागांत थंडी कमी असते म्हणून थंडीपासून रक्षण करण्यासाठी या ठिकाणी पक्षी स्थलांतर करतात. सध्या हवामानात सातत्याने होणाऱ्या बदलामुळे याठिकाणी वीस-पंचवीस (हातांच्या बोटांवर मोजणारे पक्षी आले आहेत) तसेच पक्ष्यांचे ज्याठिकाणी वास्तवयाची ठिकाणे आहेत त्याठिकाणी मासेमारीदेखील सुरू असते त्यामुळे मनुष्य सहवास तसेच मागील काही वर्षांत पक्षांच्या शिकार करण्याचे प्रकार देखील या परिसरात घडले असल्याने य पक्ष्यांनी यंदा पाठ फिरवल्याचे बोलले जात आहे.

नवीन वर्षाच्या सुरुवातीला अनेक पर्यटक नववर्षाचा आनंद साजरा करण्यासाठी या भागाला भेट देत आहेत मात्र, यंदा पक्षीच नआल्याने त्यांच्या पदरी निराशा येत आहे. यंदा उशिरा उजनी धरण भरले असून उजनी जलाशयाच्या पाण्याची पातळी अद्याप कमी न झाल्याने याठिकाणी उथळ पाणी नाही. तसेच हे पक्षी खोल पाण्यात फिरतनाही उथळ पाण्यासारखे त्यांना पुरेसे खाद्य मिळते.
– डॉ. सतीश पांडे, पक्षीतज्ज्ञ


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)