गुलाबी थंडीही नागरिकांची रसवंतीगृहांना पसंती

पिंपरी – यंदा डिसेंबर महिन्यातील गुलाबी थंडीमुळे नागरिक चांगलेच गारठले होते. मात्र, सध्या दुपारी वातावरणातील गारवा काही प्रमाणात कमी होतो. त्यामुळे थंडी ओसरताच पिंपरी-चिंचवड शहरातील बंद असलेले रसवंतीगृह पुन्हा सुरु झाली आहेत. त्यामुळे, यावर्षी जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासूनच रसवंती गृहांच्या घुंगरांची छमछम सुरु झाली आहे.

दरवर्षी हिवाळा संपण्यापूर्वी शहराच्या विविध भागांमध्ये रसवंतीगृहे सुरू झाली आहेत. छोट्या व्यावसायिकांबरोबरच अनेक मोठे व्यावसायिकदेखील उन्हाळ्यात आपल्या हॉटेलमध्ये ऊसाचा रस विक्रीसाठी ठेवत असतात. फेब्रुवारी महिन्यापासुन ते पावसाळा सुरु होईपर्यंत चार ते पाच महिने हा रसवंतीचा व्यावसाय तेजीत असतो. ग्राहकही उन्हाळ्यात उन्हाच्या तीव्रतेपासून बचाव करण्यासाठी चहा ऐवजी ऊसाचा रस घेण्यास प्राधान्य देत असतात. त्यामुळे रसवंती गृहाच्या या व्यवसायातून उन्हाळ्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात उलाढाल होत असते. यावर्षी हिवाळ्यात थंडीची तीव्रता अधिक होती. मात्र, जानेवारी महिन्याच्या सुरवातीपासून थंडी कमी होण्यास सुरवात झाली. त्यामुळे, साहजिकच शहरातील विविध भागांत रसवंती गृहे सुरु झाली आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सध्या पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक ठिकाणी रसवंती गृहे सुरू झाली आहेत. यावर्षी दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर ऊसाचा दर काही प्रमाणात वाढला आहे. सध्या रसवंती गृहासाठी शिरवळ, खंडाळा, भुईंज, खेड -शिवापुर या भागातून ऊस पुरविला जात आहे. ऊसाची एक मोळी 100 रुपयाला मिळत असल्याने मागच्या वर्षीपेक्षा ऊसाचा दर काही प्रमाणात वाढला आहे. ऊसाचे दर वाढले असले तरी रसाची किंमत मात्र स्थिर आहे. सर्वसाधारण रसवंतीगृहामध्ये 10 रुपये ते 15 रुपयाला रसाचा ग्लास मिळत आहे. त्यामुळे आतापासुनच अनेकजण चहा ऐवजी ऊसाच्या रसाला पंसती देत असल्याचे दिसत आहे.

अद्याप उन्हाची तीव्रता वाढलेली नसल्याने ग्राहकांचा तितकासा प्रतिसाद रसवंती चालकांना मिळत नाही. मात्र पुढच्या महिन्यापासून ग्राहकांचा प्रतिसाद वाढेल,असा विश्‍वास रसवंतीचालक व्यक्त करीत आहेत. सध्या तरी थंडीची लाट लवकरच ओसरल्याने रसवंतीच्या घुंगराची छमछम मात्र सुरु झाली आहे.

यंदा ऊसाची कमतरता जाणवणार नाही
यावर्षी थंडी लवकर संपल्यामुळे जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासुनच ऊसाच्या रसासाठी ग्राहकांचा प्रतिसाद काही प्रमाणात वाढला आहे. मात्र, पुढच्या महिन्यात वातावरणातील गारवा आणखीन कमी झाल्यानंतर व उन्हाची तिव्रता वाढल्यानंतर ग्राहकांची संख्या अणखीन वाढणार आहे. यावर्षी ऊसाचे दर काही प्रमाणात वाढले आहेत. मात्र, ऊस मुबलक प्रमाणात शिल्लक असल्याने ऊसाची कमतरता जाणवणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)