गुलाबी आठवण…

शाळेचे दिवसच वेगळे असतात ना… त्या वयात जो निरागसपणा असतो, नात्यांमधील सहजता ही वाढत्या वयाबरोबर हरवून जाते कुठेतरी. शाळेतील जानेवारी-फेब्रूवारीचे दिवस म्हंटलं की शालेय स्पर्धांचे वातावरण. मैदानावर लेझिमचा सराव सुरु होता. दहा दिवसांनी स्पर्धा होणार होत्या. दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी पण पहिलाच नंबर मिळवण्यासाठी आम्ही सर्व शक्ति पणाला लावून सराव करत होतो. स्नेहा लेझिमची लीडर होती; म्हणजे अजुनच कसरत. स्नेहा माझी बेंचमेट, नावाप्रमाणेच अगदी प्रेमळ ,दिसायला सुंदर, उत्तम डांस करायची ती. तिच्या डांस कौशल्यामुळे बाईंनी तिला लीडर केले होते. 

अवघे दहा दिवसच उरले होते म्हणून आम्ही दिवसभर फक्त सराव करत होतो. सराव करताना एकदम टप टप असा आवाज करत एक बॉल आमच्याकडे आला, कोणाचा बॉल आहे हे बघेपर्यंत स्नेहाने फॉर्मेशन चेंजची शिट्टी वाजवली. तोपर्यंत एक मुलगा माझ्या मागे येऊन उभा होता. बॉल घ्यायचे सोडून तो स्नेहाला बघत उभा होता. स्नेहाने बॉल येताना पाहिला होता, शिट्टी तोंडातून काढतं ती कडाडली, “लागला असता तर बॉल, स्पर्धा आहे आमची, काही झाले असते तर तू आला असता का लेझिम खेळायला’. मगाशी सांगायचे राहून गेले, स्नेहा म्हणजे शिस्त आणि शिस्त आली की आपोआपच राग हा येतोच. तसेच काहीसे झाले होते, तेवढ्यात घाबरून गेलेल्या राहुलच्या तोंडून”हो, येईल मी’ असे निघाले. “काय?’ असे जोरात स्नेहा ओरडली. ओरडण्याचा आवाज ऐकून राहुल भानावर आला, आपण काहीतरी चुकीचे बोललेले आहोत अशी त्याला जाणीव झाली आणि शस्त्र हातात घेण्याआधीच स्वतःची हार स्वीकारुन तो निघुन गेला. दुसऱ्या दिवशी पण तो आला पण हातात काहीतरी घेऊन… “वीक्‍स ची गोळी’ स्नेहाच्या हातात ठेवून तो म्हणाला,”काल आमच्या मुळे तुमच्या सरावामध्ये व्यत्यय आला म्हणून आणि तुझा आवाज ही खूप बसला आहे म्हणून ही वीक्‍सची गोळी’ एवढी दोन वाक्‍ये बोलून हसत-हसत तो खेळायला निघुन गेला. स्नेहा लीडर असल्यामुळे तिचा ओरडून-ओरडून घसा बसला होता. पण तिला वीक्‍स ची गोळी दिली तर तिला बरे वाटेल हे फक्त राहुलाच कळले होते.

सबंधित लेख : प्रेमावर बोलू काही…  प्रेम हे प्रेम असतं…

रोज तेच घडू लागले, राहुल रोज यायचा, वीक्‍सची गोळी स्नेहाच्या हातात ठेवायचा आणि हसत हसत परत खेळायला जायचा. त्याच्या या काळजीने स्नेहा त्याच्यावरचा राग कधी विसरून गेली हे तिचे तिला कळले नव्हते. आजकाल ती फक्त राहुल बद्दलच बोलायची. अवघे दोन दिवस बाकी होते स्पर्धेला आणि स्नेहाचा आवाज ही चांगला झाला होता. स्नेहाला मात्र राहुलची ओढ़ लागली होती; कारण त्या दिवशी राहुल आला नव्हता आणि स्नेहा त्याचा राग आमच्यावर काढत होती. स्नेहा आणि तिला चिडवणाऱ्या आम्ही मूली मात्र दुःखी झालो कारण राहुल न आल्यामुळे स्नेहा आमच्या कडून खूप सराव करुन घेत होती जेणेकरून तिला जास्तीत जास्त वेळ मैदानावर राहुलची वाट बघता येईल. पुढील दोन्ही दिवस तो दिसला नाही आणि आमचे जास्तीचा सराव करुन हाल-हाल झाले होते. अखेर स्पर्धेचा दिवस उजाडला, आम्ही जिंकलो. आरोळया देऊन सगळ्यांचे घसे कोरडे पडले होते. “हे घे पाणी’ असा आवाज कानी पड़ताच, हा आवाज राहुलचा आहे हे स्नेहाने ओळखले आणि ती परत कडाडली, कुठे होतास तीन दिवस..? किती वाट पाहिली मी तुझी? हो ना , तू आला नाही म्हणून खुप हाल-हाल झाले आमचे ,असं आम्हीही सुरु झालो. पण त्याचे लक्ष फक्त स्नेहा कड़ेच होते. एवढी आठवण येत होती का माझी ? असे राहुलने स्नेहाला विचारले. नाही तसे नाही पण तू रोज येत होता ना, असं म्हणत स्नेहा लाजली. अर्धे युद्ध जिंकल्याचा आनंद राहुलच्या चेहऱ्यावर दिसत होता. तेवढ्यात स्नेहा ने विचारले तू कुठे होता तीन दिवस ? तुला नाही आली का आठवण? तेव्हा राहुल शांतपणे बोलू म्हणाला ,आजच्या दिवसाची तयारी करत होतो. आजचा दिवस?स्नेहाने विचारले. आज तारीख़ काय आहे? चौदा फेब्रूवारी…काय विशेष असे ती म्हणाली. काही नाही म्हणत त्याने वीक्‍स ची गोळी काढली. ती बघून “माझा आवाज मस्त आहे” असे स्नेहा म्हणाली. हो मला माहिती आहे असे म्हणत राहुलने तिचा हात हातात घेतला आणि स्वतःच्या प्रेमाचा प्रस्ताव मांडला. हे सगळं ऐकून स्नेहाचे गाल गुलाबी झाले होते… बहुधा म्हणूनच प्रेमाच्या आठवणींना गुलाबी आठवणी म्हणत असावेत. वीक्‍स ची गोळी देऊन पटलेली मुलगी आणि वीक्‍सची गोळी हातात ठेवून केलेला प्रेमाचा आगळा वेगळा प्रस्ताव बघण्याचे सुख मला मिळाले होते….

– प्राजक्ता जाधव 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
10 :thumbsup:
5 :heart:
2 :joy:
1 :heart_eyes:
1 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)