गुलमोहर रोडवरील अनधिकृत बांधकामांवर मनपाचा जेसीबी

नगर – सावेडी उपनगरातील गुलमोहोर रस्त्यावरील वादग्रस्त शेतजमिनीवरील अनधिकृत बांधकामप्रकरणी 18 दुकानांवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाई करण्यात आली. दुपारपर्यंत 4 चार दुकाने जमीनदोस्त करण्यात आली होती. पोलिस बंदोबस्तात अतिक्रमण विभागप्रमुख सुरेश इथापे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. महापालिकेकडे सन 2016 पासून सदर अतिक्रमणांबाबत तक्रारी होत्या.

महापालिकेने संबंधितांना स्वत:हून अतिक्रमण काढण्यासाठी 20 दिवसांपूर्वी नोटीसा बजावल्या होत्या. मात्र, त्यांनी अतिक्रमण काढून न घेतल्याने आज ही कारवाई करण्यात आली. सदर जागेत पत्र्याचे शेड टाकून दुकाने उभारण्यात आली होती. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अतिक्रमण विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. कारवाईस विलंब झाल्यामुळे महापालिकेविरोधात उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी अवमान याचिकाही दाखल झाली होती. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, अनेक वर्षापासून या जागेचा वाद न्यायालयात प्रलंबित आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)