कोलकाता – गुरूशिष्य परंपरा ही भारताने जगाला दिलेली एक उत्तुंग भेट आहे असे प्रतिपादन ममता बॅनर्जी यांनी केले आहे. शिक्षक दिनानिमीत्त त्यांनी दिलेल्या संदेशात म्हटले आहे की शिक्षक हे आपले गुरू आहेत आणि त्यांचे विद्यार्थ्यांशी असलेले शिष्याचे नाते आदराने जपले जाते ही परंपरा भारताने जगाला दिलेली मोठी देणगी आहे.

शिक्षकदिनी शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी आमच्या सरकारने दरवर्षी करण्यासाठी शिक्षा रत्न पुरस्कार देण्याची प्रथा सुरू केली आहे. शाळा, महाविद्यालयांपासून विद्यापीठ पातळीवरील शिक्षकांचा या निमीत्ताने सन्मान केला जातो. ममतांनी शिक्षक दिनानिमीत्त सर्व शिक्षकांना शुभेच्छाही दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)