गुरोळी गावच्या सरपंचपदी लक्ष्मण शिंगाडे बिनविरोध

गराडे- गुरोळी (ता. पुरंदर) येथील सरपंचपदी लक्ष्मण वामन शिंगाडे यांची बिनविरोध निवड केल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी सतीश उचाळे यांनी केली. सरपंच रामचंद्र खेडेकर यांनी राजीनामा दिल्यामुळे या रिक्त जागी निवडणूक झाली. यावेळी ग्रामविकास अधिकारी स्वाती झगडे, तलाठी विश्वास आटोळे यांनी निवडणूक साहाय्यक म्हणून काम पाहिले. यावेळी उपसरपंच शोभा खेडेकर, ग्रामपंचायत सदस्य अमोल बंड, संपत खेडेकर, शोभा खेडेकर, विद्या बंड, ज्योती खेडेकर, पूनम खेडेकर, पुरंदर तालुका मनसेचे अध्यक्ष प्रकाश खेडेकर, माऊली मेमाणे, तंटामुक्तीचे अध्यक्ष सतीश खेडेकर, पोलीस पाटील कैलास जाधव, पोपट शिंगाडे, आनंद खेडेकर, संजय शिंगाडे, गोकुळ शिंगाडे, रामदास शिंगाडे, रामदास शिंगाडे उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)