गुरू-शिष्य परपंरा संस्कारक्षम शिक्षण देण्याचे कार्य करते – ह.भ.प. संतोष घनवट

वडगाव मावळ – आई-वडील व गुरू जीवनातील प्रमुख स्थान असून, त्यांच्यामुळेच जीवनाचा उद्धार होतो. समाजाच्या उन्नतीसाठी प्रत्येकानेच आपापल्यापरीने कार्य केल्यास देशाची प्रगती होईल. तंत्रज्ञानाच्या युगात युवा पिढीवर कार्यक्षम संस्कार होत नसल्यानेच त्यांच्यात माणुसकीचे दर्शन विरळ होत आहे. कार्यक्षम युवा पिढी घडण्यासाठी वारकरी संप्रदायाचा वाटा मोलाचा आहे. अनादिकाळापासून चालत आलेली गुरु-शिष्य परपंराच संस्कारक्षम शिक्षण देण्याचे महान कार्य करते, असे प्रतिपादन गुरुवर्य ह.भ.प. संतोष महाराज घनवट यांनी केले.

कामशेत (ता. मावळ) येथील श्री त्रिमूर्ती औंदुबर भक्‍त संप्रदायाच्या वतीने रविवारी (दि. 12) रोजी आयोजित गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी श्री त्रिमूर्ती औंदुबर भक्‍त संप्रदायाचे शेकडो कार्यकर्ते तसेच मावळ तालुक्‍यातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सकाळी श्री दत्त व औंदुबर यांचे पूजन गुरुवर्य संतोष महाराज घनवट व श्री त्रिमूर्ती औंदुबर भक्‍त अंकुश महाराज जाधव यांच्या हस्ते झाले. त्यानंतर ओम चैतन्य वारकरी प्रसारक समितीच्या विद्यार्थ्यांचे भजन झाले. मावळ, मुळशी व हवेली भूषण गुरुवर्य संतोष महाराज घनवट यांचे शिष्यांच्या वतीने पूजन करण्यात आले.

श्री त्रिमूर्ती औंदुबर भक्‍त अंकुश महाराज जाधव म्हणाले की, 25 गुंठे जागेत श्री त्रिमूर्ती औंदुबर भक्‍त संप्रदायाची जागा असून, गेल्या 17 वर्षांपासून अविरातपणे मावळ, मुळशी व हवेली तालुक्‍यातील हजारो विद्यार्थ्यांना आठवड्याच्या दर शनिवार व रविवारी वारकरी संप्रदायाचे संस्कार तसेच भजन, कीर्तन, प्रवचन, मृदंग, हार्मोनियम व टाळ आदींचे मोफत प्रशिक्षण देण्याचे कार्य केले जात आहे.

या ठिकाणी महाराष्ट्रातील बहुसंख्य भक्‍त दर्शनासाठी येतात. विद्यार्थ्यांना सभामंडपात येण्या व जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नाही. तसेच त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना संस्कार व प्रशिक्षण दिले जाते. त्या ठिकाणी असलेला सभामंडप गळत आहे. दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेऊन या सामाजिक कार्याला मदतीची हात देण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे आयोजन श्री त्रिमूर्ती औंदुबर भक्‍त अंकुश महाराज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विनायक महाराज हांडे व विद्यार्थ्यांनी केले. महाप्रसाद वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश महाराज इंगूळकर यांनी केले. सागर महाराज पडवळ यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)