गुरू गोविंदसिंह जयंतीनिमित्त 350 रुपयांचे खास नाणे

नवी दिल्ली – शिखांचे दहावे आणि अखेरचे गुरू गोविंदसिंह यांच्या जयंतीनिमित्त भारतीय रिझर्व बॅंक 350 रुपयांचे खास नाणे जारी करणार आहे. अर्थ मंत्रालयाने एका सूचनेद्वारा हे जाहीर केले आहे. ह्या नाण्याची निर्मिती एका मर्यादित कालावधीसाठी करण्यात येणार आहे.

हे 350 रुपयांचे नाणे चांदी, तांबे, निकेल आणि झिंक अशा चार धातूंच्या मिश्रणाने बनवण्यात येणार आहे. यातील धातूंचे प्रमाण पुढील प्रमाणे असेल-चांदी 50 टक्के, तांबे 40 टक्के, निकेल 5 टक्‍के आणि झिंक 5 टक्के. 44 मिमि व्यासाच्या या नाण्याचे वजन 35 ग्रॅम असणार आहे. नाण्याच्या पुढील बाजूस अशोकस्तंभ व त्याखाली सत्यमेवजयते आणि मागील बाजूस तख्त श्री हरमिंदर जी पाटणा साहिब यांचे चित्र असणार आहे. चित्र्राच्या वरच्या आणि खालच्या बाजूस गुरू गोविंदसिंह 350वी जयंती असे इंग्रजी व देवनागरीत लिहिलेले असेल. नाण्याच्य दोन्ही बाजूंस 1666 आणि 2016 हे अंक असतील.

कमी किमतीच्या नाण्यांचा वापर चलनात होत नसल्याने मोठ्या किमतीची नाणी जारी करण्याचा निर्णय रिझर्व बॅंकेने घेतला आहे. मात्र 350 रुपये किमतीची नेमकी किती नाणी जारी करण्यात येतील याबद्दल रिझर्व बॅंकेने काही खुलासा केलेला नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)