गुरूवारपासून अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरळीत होईल : विनोद तावडे

मुंबई : दहावीच्या निकालानंतर अकरावी प्रवेशातील निर्माण झालेल्या गोंधळावर आज राज्य सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. प्रवेशात काही घोळ असतील तर ते बुधवारपर्यंत दूर करण्यात येतील आणि गुरुवारपासून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरळीत होणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली. अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशासंबंधीचा गोंधळ मिटवण्यासाठी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत विनोद तावडे बोलत होते. एक दिवस उशिर होईल पण 22 जुनपासून अकरावीची प्रवेशप्रक्रिया सुरळीत होईल असा विश्वास शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी व्यक्त केला आहे.
दहावीच्या निकालानंतर सर्व विभागात प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, अमरावतीमध्ये ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया सुरु झाली आहे. मुंबईतही पार्ट 1 मध्ये 30 हजार विद्यार्थ्यांचं फॉर्म भरण राहिलं असेल किंवा डिप्लोमाकडे ते गेले असतील. तसेच पार्ट 2 चा 67,289 विद्यार्थ्यानी फॉर्म भरला आहे. मात्र नंतरच्या काळात सर्व्हर स्लो झाल्याच्या तक्रारी आल्या. त्यामुळे अधिकचे 3 सर्व्हर वाढवले आहेत आणि बॅंडविड्‌थ वाढवण्याची सूचना दिली आहे, अशी माहिती विनोद तावडेंनी दिली आहे. सर्व्हर स्लो झाल्यामुळे अनेकांना ऑनलाईन फॉर्म भरताना अडचणी येत होत्या. ज्यांनी अर्ज भरला आहे त्यांना पुन्हा भरण्याची गरज नाही. कला आणि स्पोर्टस विषयातही पुर्नमुल्यांकनाची सुविधा मिळणार आहे, फेरतपासणीसाठी अर्जही करता येणार आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांना गणित आणि इंग्रजी विषय अवघड जातात, त्यांना गणिताशिवाय करिअर करता येऊ शकते. तज्ञांशी चर्चा करुन योग्य प्रतिज्ञापत्र सादर करणार असल्याचेही तावडेंनी स्पष्ट केले आहे. अतिरिक्त गुणांसाठी विद्यार्थी पुन्हा वेबसाइटवर अप्लाय करु शकतील असेही तावडेंनी म्हटले आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर आम्ही अन्याय होऊ देणार नाही, त्यामुळे उद्या बुधवारचा एक दिवस आम्ही सर्व तांत्रिक त्रुटी दूर करण्यासाठी घेणार आहोत, आणि गुरुवारपासून अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरळीत करण्यात येणार असल्याची माहिती तावडेंनी दिली. एक दिवस उशीर होईल पण प्रवेश प्रक्रिया बिनचूक होईल असेही तावडेंनी स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)