मानाचा तिसरा गणपती : गुरूजी तालीम

यंदाचे मंडळाचे वर्ष १३१ वे 


मिरवणुकीस प्रारंभ सकाळी १० वाजता 


 श्रींची प्राणप्रतिष्ठापना दुपारी १ वाजता 

मानाचा तिसरा गणपती असलेल्या गुरूजी तालीम मंडळाची स्थापना 1887 साली झाली आहे. विशेष म्हणजे हिंदु-मुस्लिमांनी एकत्र येत स्थापना या मंडळाची स्थापना केली आहे. भिकु पांडुरंग शिंदे, नानासाहेब खासगीवाले, रुस्तुमभाई आणि लालाभाई या बंधूनी एकत्र येत मंडळाची स्थापना केली आहे. मुषकावर विराजमान “श्री’ची ही मूर्ती आहे. “पुण्याचा राजा’ अशी या मंडळाची ओळख आहे. सध्या प्रवीण परदेशी मंडळाचे अध्यक्ष आहेत.

सुभाष सरपाळे यांनी सजविलेल्या फुलांच्या रथातून श्रींची मिरवणूक सकाळी 10 वाजता गणपती चौकापासून निघणार आहे. लिंबराज महाराज चौक, आप्पा बळवंत चौक, जोगेश्‍वरी मंदिर चौक, बुधवार चौक, बेलबाग चौक या मार्गाने मिरवणूक उत्सव मंडपात येईल. नादब्रह्म, गर्जना, सासवडचे शिवरुद्र आणि गुरुजी प्रतिष्ठान या ढोल-ताशापथक, अश्‍वराज बॅंड, जयंत नगरकर यांच्या नगरावादनाचा समावेश असणार आहे. दुपारी 1 वाजता उद्योजक आदित्य शर्मा यांच्या हस्ते गणेशाची प्रतिष्ठापना होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)