गुरु रविदास जयंतीनिमित्त पंतप्रधानांकडून आदरांजली

नवी दिल्ली : गुरु रविदास जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरांजली अर्पण केली आहे. जयंतीनिमित्त गुरु रविदास यांना नमन, गुरु रविदास हे आपल्या भूमीवरचे एक महान संत होते. शिकवण शाश्वत असून आजच्या काळासाठीही ती उपयुक्त आहे.

गुरु रविदासजी यांनी आपल्या समाजात अनेक सकारात्मक बदल घडवले. काळाच्या मागे असणाऱ्या प्रथांबाबत प्रश्न उपस्थित  करुन काळाशी सुसंगत बदल घडवण्यासाठी त्यांनी जनतेला स्फूर्ती  दिली. त्यांचे कार्य महान आहे.

-Ads-

सलोखा, आणि बंधुत्वाच्या मूल्यांवर गुरु रविदास यांचा दृढ विश्वास होता. भेदभावाला त्यांनी कधीच थारा दिला नाही. सबका साथ, सबका विकास हे तत्व घेऊन आपण वाटचाल करत आहोत त्यामागे गुरु रविदास यांच्या, मानवाची विशेषत: गरीबांची सेवा करण्याच्या तत्वाची प्रेरणा आहे असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)