गुरु तेग बहाद्दूर फुटबॉल स्पर्धा 2018: रेंज हिल्स, एसकेएफची विजयी सलामी

पुणे: रेंज हिल्स मॅथ्यु फुटबॉल ऍकेडमी, एसकेएफ, टायगर स्पोर्टस फाऊंडेशनया संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करताना येथे सुरू असलेल्या गुरु तेग बहाद्दूर फुटबॉल स्पर्धेतील महिला गटातील सामन्यांमध्ये विजयी सलामी दिली.

यावेळी कॉलेज ऑफ इंजिनियरींगच्या मैदानावर झालेल्या रेंज हिल्स मॅथ्यु फुटबॉल ऍकेडमी आणि कमांडोज फुटबॉल क्‍लब दरम्यानच्या सामन्यात रेंज हिल्सच्या संघाने कमांडोजच्या संघाचा 2-1 असा टाय ब्रेकरच्या दरम्यान पराभव करत उद्घाटनाचा दिवस गाजवला. यावेळी सामन्याच्या पुर्ण वेळेसह अतिरिक्त वेळे पर्यंत एकही गोल ब झाल्याने टाय ब्रेकरमध्ये सामन्याचा निकाल ठरविण्यात आला. यावेळी रेंज हिल्सच्या दिव्या भुक्‍के आणि प्रतिक्षा माणेयांनी गोल केले. तर, कमांडोजच्या कशिशने एकमेव गोल केला.

तर, दुसऱ्या सामन्यात एसकेएफच्या संघाने स्निगमयसंघाचा 1-0ने पराभव करत विजयी आगेकूच नोंदवली. यावेळी एसकेएफच्या श्‍वेता अष्टक्केने सामन्याच्या 12व्या मिनिटाला एकमेव गोल नोंदवत त्यांना विजय मिळवून दिला. तर, तिसऱ्या सामन्यात टायगर स्पोर्टस फाऊंडेशनच्या संघाने स्निगमय संघाचा 1-0 असा पराभव करत आगेकूच नोंदवली. तर चौथ्या सामन्यात लायन स्पोर्टस संघाने सासवड फुटबॉल क्‍लबचा टाय ब्रेकर दरम्यान 2-1 असा पराभव करत आगेकूच नोंदवली. यावेळी सासवडच्या श्रावनी वाघमारेने एकमेव गोल केला. तर, लायन्स स्पोर्टसच्या मीरा शर्मा आण्इ माया मानेने गोल करत संघाला विजय मिळवून दिला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)