गुरु ऐसा हो तो शिष्य निकम्मा निकलेगा – अरुण जेटली 

नवी दिल्ली – पुलवामा दहशतवादी हल्ल्यासंदर्भात काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांच्या वक्तव्याने नवा राजकीय वाद उभा राहिला आहे. गुरु असा असेल तर शिष्य कसा असेल याचा अंदाज येऊ शकतो, असा निशाणा अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काँग्रेस आणि सॅम पित्रोदा यांच्यावर निशाणा साधला.

अरुण जेटली म्हणाले कि, आम्ही केलेले दोन्ही ऑपरेशन यशस्वी राहिले असून, आधी देशात घुसून दहशतवादी हल्ल्या करणाऱ्यांवर कारवाई व्हायची. पण आता जिथून दहशतवादाला सुरुवात होते तिथेच कारवाई केली जात आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच पित्रोदा यांनी केलेले वक्तव्य अतिशय दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. एवढेच नव्हे तर ज्यांना देशाची समज नाही तेच लोक असे वक्तव्य करतात अशीदेखील टीका त्यांनी केली.

दरम्यान, सॅम पित्रोदा गांधी कुटुंबियांचे निकटवर्तीय असून इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)