गुरुवर्य गुणवंत पुरस्काराने बहीण-भाऊ सन्मानित

मंचर- आंबेगाव तालुक्‍यातील भराडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका मिनाक्षी वळसे पाटील आणि त्यांचे भाऊ अशोक बांगर यांना आमदार शरद सोनवणे यांच्या हस्ते गुरुवर्य गुणवंत पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे, जुन्नर तालुका शिक्षक पालक संघ, स्व. रामचंद्रजी जाबेल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. वि. वि. चिपळुणकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिक्षण उपनिरिक्षक अनिल गुंजाळ, मुंबई संस्थेचे विश्‍वस्त वल्लभ शेळके, प्रभारी गटशिक्षण अधिकारी पी. एस. मेमाणे, शिक्षकतज्ञ रामभाऊ सातपुते आदी उपस्थित होते. मिनाक्षी वळसे पाटील यांनी केलेल्या उत्कृष्ट कामांमुळे काठापूर प्राथमिक शाळेला स्वच्छ व सुंदर शाळेचा पुरस्कार मिळाला आहे. शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी ही त्यांचे बहुमोल योगदान आहे. तसेच शिंगवे येथील शाळेचे मुख्याध्यापक नवनाथ शिनलकर, दत्ता गोरडे, केंद्रप्रमुख संचिता अभंग, पेन्शन संघटनेचे आंबेगाव तालुकाध्यक्ष भास्कर लोंढे, सचिव धोंडिभाऊ शिंदे यांनी गुणवंत आदर्श संस्था पुरस्कार स्वीकारला. जुन्नर तालुक्‍यातील गुळुचवाडी शाळेचे उपशिक्षक अशोक बांगर यांना गुणवंत शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)