मुंबई: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार गुरुदास कामत यांचे आज सकाळी दिल्लीच्या चाणक्यपुरी येथील रुग्णालयात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ६३ वर्षांचे होते.
कामत यांच्या निधनांनंतर दिग्गज काँग्रेस नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. दरम्यान ,गुरुदास कामत यांच्या निधनाने एक उत्तम संसदपटू व अभ्यासू वक्त्याला आपण मुकलो असल्याची भावना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे. गुरुदास कामत हे महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेता होते. २००९ मध्ये त मुंबईतील लोकसभेच्या उत्तर पश्चिम मतदारसंघातून निवडून आले होते.
जयंत पाटील म्हणाले, कामत यांच्या निधनाचे वृत्त येऊन धक्का बसला. महाराष्ट्राच्या विशेष म्हणजे मुंबईमधील कॉंग्रेस मजबूत करणारा एक कर्तुत्ववान नेता गमावला आहे.
गुरुदास कामत यांच्या निधनाने एक उत्तम संसदपटू व अभ्यासू वक्त्याला आपण मुकलो आहोत.#RIP #GurudasKamat pic.twitter.com/Rxw6eEpHTT
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) August 22, 2018
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा