गुरुदास कामत यांच्या अचानक निधनाने कॉंग्रेस कुटुंबाला मोठा धक्का ! – राहुल गांधी

नवी दिल्ली: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार गुरुदास कामत यांचे आज सकाळी दिल्लीच्या चाणक्यपुरी येथील रुग्णालयात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ६३ वर्षांचे होते. कामत यांच्या निधनांनंतर दिग्गज काँग्रेस नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे.

कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले, ” वरिष्ठ नेते गुरुदास कामतजी यांचे अचानक निधन होणे कॉंग्रेस कुटुंबाला एक मोठा धक्का आहे. गुरुदासजींनी मुंबईत कॉंग्रेस पक्ष वाढवला. आणि त्यांना सर्वांचा सन्मान आणि प्रशंसा मिळाली”.

महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले, ” ज्येष्ठ काँग्रेस नेते व माझे सहकारी गुरुदास कामत यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक आहे. त्यांच्या निधनामुळे निष्ठावंत व समर्पित नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले. मी कामत कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे. गुरुदास कामत यांना भावपूर्ण श्रध्दांजली!

गुरुदास कामत हे महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेता होते. २००९ मध्ये त मुंबईतील लोकसभेच्या उत्तर पश्चिम मतदारसंघातून निवडून आले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)