गुरुकुलात सृजनात्मकते बरोबरच नवनिर्मितीचे शिक्षण

आळंद- वर्तमान शिक्षण पद्धती ही परिक्षार्थी झाली आहे. त्यातून विद्यार्थ्यांना शिकायला काहीच मिळत नाही. तेव्हा सृजनात्मक शिक्षणाबरोबच नवनिर्मिती करण्याचे शिक्षण शालेय स्तरावरून होणे गरजेचे आहे, असे मत नालंदा विद्यापीठाचे कुलपती व जगविख्यात संगणक तज्ज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांनी व्यक्‍त केले.

एमआयटी, पुणे संचालित विश्‍वशांती गुरुकुल सीबीएससी या राष्ट्रीय कीर्तीच्या शालेय शिक्षणसंस्थेच्या केळगाव-हनुमानवाडी, आळंदी (देवाची), या शाखेच्या उद्‌घाटन समारंभप्रसंगी डॉ. भटकर बोलत होते. याप्रसंगी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.विश्‍वनाथ दा. कराड, प्रख्यात नाट्य- चित्रकर्मी डॉ. जब्बार पटेल, युपीएससीचे माजी अध्यक्ष डी. पी. अग्रवाल, शिवचरित्रकार नितीन बानगुडे पाटील, श्रीक्षेत्र देहू येथील श्री संत तुकाराम महाराज संस्थांचे माजी अध्यक्ष बापूसाहेब मोरे देहूकर, आळंदीच्या नगराध्यक्षा वैजयंती कांबळे व राहुल कलाटे, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष प्रा. राहुल विश्‍वनाथ कराड, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड, विश्‍व शांती गुरुकुलाच्या शैक्षणिक संचालिका व प्राचार्या के. पी. शशिकला, विश्‍वशांती गुरुकुलाचे प्रकल्प संचालक आनंद देवधर व एमआयटी वर्ल्ड पीस विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. डी. पी. आपटे उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)