गुप्तचर विभागामधील 500 अधिकाऱ्यांच्या बदल्या

नवी दिल्ली : गुप्तचर विभागामध्ये सरकारने आतापर्यंतचा सर्वात मोठा फेरबदल केला आहे. देशभरातील सुमारे 500 गुप्तचर अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

आगामी पाच राज्यांतील निवडणुकांनंतर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बदल्यांवरून राजकीय वातावरण तापू शकते. मिळालेल्या माहितीनुसार, बंगळुरू युनिटचे सर्व अधिकारी तामिळनाडूत पाठवले. भोपाळ, चंदिगड, अहमदाबाद, भुवनेश्वर, दिल्ली व गुवाहाटीसह अनेक जागी अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. उच्चपदावरील अधिकाऱयांनी ही नेहमीची प्रक्रिया असल्याचे म्हटले आहे. एका अधिकाऱयाने सांगितले की, या बदल्यांचा निवडणुकीशी संबंध नाही. अनेक अधिकारी 20-25 वर्षांपासून एकाच जागी तैनात होते. 5 वर्षांपेक्षा जास्त काळ पोस्टिंग असलेल्या अधिकाऱ्यांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)