गुन्हेगारी रोखण्यासाठी सीसीटीव्हीवर अधिक भर

नवनीत कांबळे 

नागरिकांचेही सहकार्य अपेक्षित


सतर्कतेसाठी भागात सीसीटीव्ही लावा

पुणे – चोरी, लुटमार, दरोडा यांसह मोठे गुन्हे रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात असून यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर अधिक भर देण्यात येत आहे. र्दौड पोलीस ठाण्याच्या हद्‌दीत आतापर्यंत सुमारे 4 लाख रूपयांचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे या भागात गुन्हेगारीचे प्रमाण कमी झाले असून याला आळा बसण्यास मदत होत आहे, असे दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी सांगितले आहे.

दौंड पोलीस ठाण्याच्या हद्‌दीत मोठ्या प्रमाणात तडीपारची कारवाई केली आहेत. त्यामुळे गावठी कट्‌टा जवळ बाळगणे, असे प्रकार आढळत नाही. तडीपारच्या कारवाईमुळे गावठी कट्‌टा जवळ ठेवण्यास धजत नाही. त्यामुळे गुन्हेगारीला आळा बसण्यास मदत होत आहेत.
– भगवान निंबाळकर, पोलीस निरीक्षक, दौंड पोलीस ठाणे.

सध्या दौंड शहरातील रेल्वे स्टेशन, नेहरू चौक, आंबेडकर पुतळा आदी भागात अधिक प्रमाणात विविध कोनातून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे जर एखादा गुन्हा घडला तर गुन्हेगार कॅमेऱ्यात कैद होईल आणि त्याला पकडण्यात येईल. याचप्रमाणे नागरिकांनीही आपल्या राहत्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यावर भर दिला पाहिजे. तरच, चोरी, लुटमार, दरोडा यासारखे गुन्ह्यांना आळा बसणार आहे.

यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करण्याची अवश्‍यकता आहे. तसेच आणखी दौंड शहर आणि हद्‌दीत ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यावर भर देण्यात येणार आहे. यासाठी सुमारे 15 ते 20 लाख रूपयांपर्यंत खर्च अपेक्षित आहे. असेही निंबाळकर यांनी सांगितले.

याचबरोबर, र्दौड पोलीस ठाण्याच्या हद्‌दीतील अनेक मोठे गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे. मोठे गुन्हे लक्षात घेऊन त्यातील गुन्हेगारांना योग्य शासन आणि त्यांच्या गुन्हे प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी पोलिसांच्या वतीने योग्य पावले उचलली जात आहेत. यातील अनेकांना तडीपारही केले आहे.

पुणे पोलीस मुख्यालयातील पुणे ग्रामीण जिल्हा विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, दौंड पोलीस ठाण्याच्या हद्‌दीत फेब्रुवारी 2018 अखेर भाग 5 मध्ये 109 गुन्हे दाखल असून त्यातील 50 गुन्हे उघड झाले आहेत. तर भाग 6 मध्ये 15 गुन्हे दाखल असून त्यातील 13 गुन्हे उघड झाले आहहेत.

…म्हणून तडीपारचा प्रस्ताव
दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी काहींवर तडीपारीची कारवाई केली आहे. यातील सुमारे 92 आरोपी/संशयितांना 10 दिवसांसाठी तडीपार केले आहे. दरोडे, गुंड अशा सुमारे 49 लोकांना तडीपारचा प्रस्ताव पाठविला आहे. यात त्यांना तीन जिल्ह्यातून तीन वर्षासाठी तडीपारचा प्रस्ताव सादर केला आहे. मात्र, यात दोन जिल्ह्यातून अर्थात पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपारचे आदेश दिले आहेत. त्यानुसार त्यांना तडीपार केले आहे. यामुळे गुन्हेगारीला आळा बसण्यास मदत झाली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)