गुन्हेगारी प्रकरणात मोरोक्को बरोबर कायदेशीर सहाय्य करारास मान्यता 

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोरोक्को बरोबर गुन्हेगारी प्रकरणात परस्पर कायदेशीर सहाय्य देण्याबाबतच्या कराराला मान्यता देण्यात आली. 

या करारामुळे गुन्ह्यांचा तपास आणि खटले, माग काढणे, नियंत्रण, दंड किंवा जप्ती, गुन्ह्यातील हत्यारे या संदर्भात द्विपक्षीय सहकार्याबाबत विस्तृत कायदेशीर चौकट मिळेल गुन्ह्यांचा तपास आणि खटले दाखल करण्यातील कार्यतत्परता वाढवणे हा देखील उद्देश आहे. संघटीत गुन्हेगारी तसेच दहशतवाद्यांच्या कार्य पद्धतीबाबत अधिक चांगला दृष्टीकोन निर्माण व्हायला मदत होईल. ज्यांचा वापर अंतर्गत सुरक्षा क्षेत्रातील धोरणात्मक निर्णय घेताना होईल. 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वाहतूक मंत्रालय आणि रशिया महासंघादरम्यान वाहतूक शिक्षण क्षेत्रातील सहकार्य विकसित करण्याबाबत सामंजस्य करार रेल्वे क्षेत्रातल्या तांत्रिक सहकार्यासंदर्भात रशियन रेल्वे या संयुक्त समभाग कंपनीशी सहकार्य करार या दोन्ही करारांमुळे रेल्वे क्षेत्रातील अत्याधुनिक विकास आणि माहिती वाटून घेण्यासाठी भारतीय रेल्वेला एक मंच उपलब्ध होईल. 

या करारांमुळे तांत्रिक तज्ज्ञांची अहवाल आणि तंत्रज्ञानविषयक कागदपत्रांची देवाण-घेवाण, विशिष्ट तंत्रज्ञान क्षेत्रावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी प्रशिक्षण आणि चर्चासत्र/कार्यशाळा तसंच माहिती वाटून घेण्यासाठी इतर देवाणघेवाण सोयीची होईल. या दोन्ही करारांना मंत्रिमंडळाची मंजूरी देण्यात आली. 

याशिवाय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पर्यटन क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी भारत आणि कोरिया दरम्यानच्या सामंजस्य कराराला आज मान्यता देण्यात आली. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)