गुन्हेगारी पार्श्ववभूमीच्या नेत्यांना निवडणूक लढण्यापासून रोखू शकत नाही

नवी दिल्ली – गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या नेत्यांना निवडणूक लढवण्याचा अधिकारावर असावा कि नसावा यावर आज सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. आरोपपत्र दाखल असलेल्या नेत्यांना निवडणूक लढवण्यापासून रोखू  शकत नसल्याचे न्यायालयाने म्हंटले आहे. यासंबंधी संसद कायदा बनवू शकते. शिवाय संसदेच्या अधिकारांमध्ये न्यायालय हस्तक्षेप करू शकत नसल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

गुन्हेगारी पार्श्ववभूमीच्या नेत्यांना निवडणूक लढवण्यापासून रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती. यावरील युक्तिवाद संपल्यानंतर ब्यालयाने आपला निर्णय राखून ठेवला होता. परंतु, आज न्यायालयाने आरोपपत्र दाखल असणाऱ्या नेत्यांना निवडणूक लढण्यापासून  रोखता येणार नसल्याचे स्पष्ट केले. शिवाय राजकारणाचे गुन्हेगारीकरण रोखण्यासाठी संसदेने कायदा करावा, असेही म्हंटले आहे. तर निवडणूक उमेदवारांनी आपल्यावरील गुन्ह्यांची माहिती द्यायला हवी. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर किमान तीन वेळा माध्यमांमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमीची जाहिरात राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी द्यावी, असेही न्यायालायने सांगितले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, सध्या ९८ खासदारांसह १५१८ नेत्यांविरोधात विविध गुन्हे दाखल आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील ६५, बिहारमधील ३२ तर पश्चिम बंगालचे ५२ नेते आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)