गुन्हेगारांना मानवाधिकार नसतो – चौहान

शिवराजसिंह चौहान यांचे वादग्रस्त विधान
भोपाळ – गुन्हेगारांना मानवाधिकार नसतो असे वादग्रस्त विधान मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केले आहे. राज्यातील पोलिसांनी अलिकडेच काही गुन्हेगारांना अन्य लोकांच्या देखत मारहाण केल्याच्या घटना घडल्या आहेत त्यावरून राज्याच्या पोलिसांवर टीका होत आहे पण त्याचे समर्थन करताना मुख्यमंत्र्यांनी वरील शब्दात पोलिसांच्या या कारवाईचे समर्थन केले आहे.

महिलांची सुरक्षा या विषयावर एका संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे विधान केले. ते म्हणाले की महिलांवरील अन्याय-अत्याचाराच्या बाबतीत आमचे सरकार झिरो टॉलरन्सचे धोरण राबवत आहे. महिलांना सुरक्षा पुरवणे ही आमच्या सरकारची प्राथमिकता आहे. जे गुन्हेगार छेडछाडीचे प्रकार करून आमच्या मुलींना घराबाहेर पडण्यास जिकीरीचे करतात अशा गुन्हेगारांचे मानवाधिकाराच्या नावाखाली लाड केले जाणार नाहींत. त्यांना मानवाधिकार नसतो.

पोलिसांना पुर्ण अधिकार देण्यात आले असून ते गुन्हेगारांच्या विरोधात केव्हाही कारवाई करू शकतात असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. गुन्हेगारांच्या बाबतीत मानवाधिकार कार्यकर्त्यांनीही सावधगिरी बाळगली पाहिजे अशी सुचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)