गुन्हा मागे घेण्यावरून एकाला मारहाण

सातारा,दि.12(प्रतिनिधी) – पोलिस ठाण्यात दाखल असलेली गुन्हा मागे घेत नाही. म्हणून एकाला मारहाण करण्यात आली. याप्रकरणी तीघांविरोधात सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. महेश सावंत,धीरज सावंत,महेंद्र सावंत (सर्व रा. नागेवाडी,ता.सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
काही दिवसापुर्वी फिर्यादीच्या आईने संशयीताच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. ती तक्रार मागे घेण्यासाठी संशयीत फिर्यादीला दमदाटी करत होते. मात्र फिर्यादी त्यास नकार देत होता. त्याचाच राग मनात धरून दि.11 रोजी संशयीतांनी फिर्यादीला नागेवाडी येथे जबरी मरहाण केली. याप्रकरणी सातारा तालुका पोलिस तपास करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)