गुन्हा दाखल होण्यासाठी इमामपूर ग्रामस्थांचे उपोषण

जिल्हा परिषदेत घोषणाबाजी अन्‌ ठिय्या

नगर: नगर तालुक्‍यातील इमामपूर ग्रामपंचायतमधील गैरव्यवहार प्रकरणावरून आता चांगलेच राजकारण सुरू झाले आहे. शनिवारी गैरव्यवहार झाला नसल्याने जिल्हा परिषदेने कारवाई मागे घ्यावी या मागणीसाठी शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्य, सरपंचासह अन्य ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या थेट दालनात तब्बल तीन तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. आता दुसऱ्या गटाने ग्रामस्थांसह गैरव्यवहार प्रकरणी तातडीने गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी सोमवारी दुपारी जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी विश्‍वजीत माने यांच्या दालनासमोर घोषणाबाजी करत उपोषण सुरु केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयात नसल्याने अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या ग्रामस्थांचे निवेदन स्वीकारले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी शिवसेना सदस्याच्या दबावाखाली येत असून चुकीचे कामे करणाऱ्यांना पाठिशी घालण्यात येत असून गैरव्यवहाराची चौकशी झाल्यानंतर देखील कारवाई होत नाही.म्हणून हे आंदोलन करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. यावेळी इमामपूर येथील गणेश आवारे, ईश्‍वर जरे, उद्धव मोकाटे, आबा मोकाटे, सोमनाथ टिमकरे, दामोधर आवारे, भाऊसाहेब साळवे, विजय आवारे, विजय वाणी, मारुती मोकाटे, पांडुरंग पाटोळे, दादू मेजर, रामभाऊ जरे, प्रशांत जरे, सखाराम टिमकरे यांच्यासह ग्रामस्थांनी हे आंदोलन केले.

माने यांना शनिवारी निवेदन दिले होते. नगर तालुक्‍यातील इमामपुर येथील ग्रामपंचायतीच्या वतीने केलेल्या 14 व्या वित्त आयोगातील कामामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार व अनियमिता झालेली असुन गावातील राधाकिसन बाबुराव आवारे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन झालेल्या चौकशीत ते सिध्द झालेले आहे. तसा चौकशी अहवाल जिल्हा परिषदेला प्राप्त झालेला आहे. त्या अहवालामध्ये दोषी असलेल्या सरपंच व ग्रामसेवक, तसेच अधिकारी यांच्यावर जोपर्यंत फौजदारी गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आम्ही सर्व ग्रामस्थ सोमवारी जिल्हा परिषदसमोर अमरण उपोषण करणार आहोत.

असे ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात म्हटले होते. त्यानुसार आज आंदोलन करण्यात आले. यापूर्वी शनिवारी सरपंच मंदा जरे यांच्यासह पंचायत समिती सदस्य गोविंद मोकाटे व शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्यांनी माने यांच्या दालनात आंदोलन केले.या कामांच्या फेरचौकशीचे आश्‍वासन घेतले. त्यामुळे आता विरोधी गटाने आज पुन्हा चौकशी झाली आहे. दोषी ठरविण्यात आलेल्या सरपंचासह अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी केली आहे. त्यामुळे इमामपूरमधील विकास कामांचे राजकारण आता चांगलेच पेटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)