गुनाट ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी दिप्ती करपे

निमोणे – शिरूर तालुक्‍यातील गुनाट येथील सरपंचपदी दिप्ती गणेश करपे यांची बुधवार (दि. 28) बिनविरोध निवड करण्यात आली. ऑगस्ट 2015 रोजी गुनाट ग्रामपंचायतच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये 6-3फरकाने सत्ताधारी पॅनेलने निवडणूक जिंकली होती. त्यावेळेस ग्रामदैवत दत्त मंदीरात चिठ्ठी टाकून अडीच-अडीच वर्षे सरपंच पद भूषविण्याचे ठरले होते. त्यानुसार नंदा अनिल करपे यांना सुरूवातीचे अडीच वर्षे सरपंचपद तर दिप्ती गणेश करपे यांना पुढील अडीच वर्षे सरपंच पद देण्याचे निश्‍चित करण्यात आले. त्यानुसार नंदा करपे यांचा कालावधी संपल्यानतर त्यांनी राजीनामा दिला. त्या रिक्त झालेल्या जागेवर दिप्ती करपे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीनंतर सरपंच दिप्ती करपे म्हणाल्या, गावच्या सर्वांगिण विकासासाठी सर्वांना बरोबर घेऊन जास्तीत जास्त निधी उपलब्ध करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे.

या कामी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस. डी. रांखुडे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून घोडके आणि ग्रामसेवक एस. डी. पोळ यांनी जबाबदारीचे काम पाहिले. सरपंच निवडीसाठी वसंत पडवळ, सतीश सोनवणे, अनिल करपे, रमेश गाडे, तुकाराम गव्हाणे, मा.सरपंच गहिणीनाथ डोंगरे, मा उपसरपंच बाळासाहेब करपे, विठ्ठल करपे, माऊली भगत, माजी सरपंच दौलत सोनवणे, माऊली बहिरट, संतोष गव्हाणे, रंगनाथ भोरडे, सदस्य गणेश कोळपे यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)