गुदमरलेला शिवाजीनगर परिसर “मोकळा’

अनधिकृत टपऱ्या, हातगाड्या, खाद्यपदार्थ्यांच्या स्टॉलवर कारवाई


अवघ्या काही तासांतच 30 पेक्षा जादा गाड्या हटविल्या

पुणे – शिवाजीनगर परिसरातील एसटी स्टॅण्ड, रेल्वे स्टेशन, न.ता. वाडी डेपो रस्त्यांवर लावण्यात आलेल्या अनधिकृत टपऱ्या, हातगाड्या तसेच खाद्यपदार्थांचे स्टॉल महापालिका आणि वाहतूक पोलिसांकडून हटवण्यात आले. मंगळवारी अवघ्या काही तासांतच 30 पेक्षा जादा गाड्या येथून उचलण्यात आल्याने शिवाजीनगर परिसराने मोकळा श्‍वास घेतल्याचे दिसून आले. दरम्यान, रात्री उशीरापर्यंत ही कारवाई सुरू होती.

महापालिकेकडून साधारण दोन ते तीन दिवसांपूर्वी अशाच पध्दतीने महापालिका आणि वाहतूक पोलिसांच्या मदतीने स्वारगेट चौक मोकळा केला होता. यानंतर मंगळवारी शिवाजीनगर परिसरात कारवाई केल्याने येथील रस्ते मोकळे झाले आहेत. यामुळे एसटी बसला स्टॅण्डमध्ये जाण्यासाठी करावी लागणारी कसरतही कमी झाली आहे.

-Ads-

मागील काही दिवसांपासून शहरातील वर्दळीच्या ठिकाणी रस्ते मोकळे करण्याची मोहीम महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी संयुक्तरित्या हाती घेतली आहे. शिवाजीनगर परिसरात येत्या काही दिवसांत मेट्रोचे काम सुरू होणार आहे. यामुळे येथील अनधिकृत स्टॉल हटविण्याचे काम करण्यात आले. एसटी स्थानकाच्या शेजारीच हातगाड्या, टपऱ्या लागत असल्याने ये-जा करणाऱ्या वाहनांना अडचण होत होती. तसेच, या प्रकारामुळे वाहतूक मंदावत असल्याने महापालिका आणि वाहतूक पोलिसांकडून कारवाई सुरू असल्याचे वाहतूक विभागाचे सहायक पोलीस आयुक्त प्रभाकर ढमाले यांनी सांगितले. महापालिका अतिक्रमण नियंत्रण विभागाचे प्रमुख माधव जगताप, शिवाजीनगर वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक बापू शिंदे आदींनी सामुहीकरित्या ही कारवाई केली.

What is your reaction?
2 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)