गुणी शिक्षकांमुळे पिढ्या घडल्या -मांजरे

चाकण -जनता शिक्षण संस्थेतील चाकण येथील प्रशालेतील विद्यादानाचे काम करणाऱ्या गुणी शिक्षकांमुळे अनेक चांगल्या पिढ्या घडल्या असल्याचे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद सदस्य किरण मांजरे यांनी चाकण येथे केले.
आदर्श शिक्षिका सुमन आवटे यांच्या सेवापूर्ती समारंभ प्रसंगी मांजरे बोलत होते. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा मंगल गोरे होत्या. चाकण येथील नेहरू बालक मंदिर व शिवाजी विद्यालयातील आदर्श शिक्षिका सुमन रामचंद्र आवटे यांचा सेवापूर्ती समारंभ नुकताच उत्साहात पार पडला. यावेळी जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय वाडेकर, सचिव सुभाष गारगोटे, माजी शिक्षणाधिकारी अशोक कडलक, देवयानी पवार, प्राचार्य अरुण देशमुख, मुख्याध्यापिका माधुरी कोळी, रामदास उनधरे आदींसह शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मनोगतातून सुमन आवटे यांनी आपल्या कार्यकाळातील प्रशालेशी जोडलेल्या आपल्या भावना व्यक्त केल्या. प्रास्ताविक, सूत्रसंचालन मुरलीधर मांजरे यांनी केले तर शंकर बर्वे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)