गुणवत्ता व शिस्तीचे थोरात महाविद्यालय विद्यार्थ्यांसाठी ठरतेय संस्कारपीठ … 

संगमनेर : सातत्यपूर्ण गुणवत्तेचे वैशिष्ट्या जपतांना सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कला, विज्ञान व वाणिय महाविद्यालयाने शिस्त, उत्कृष्ट कामकाज व विविध उपक्रमांचे आयोजनातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी संस्कारपीठ ठरले असल्याचे गौरवौद्गार प्राचार्य डॉ.आर.के.दातीर यांनी काढले आहेत. शैक्षणिक वर्ष 2017-2018 मधील विविध उपक्रमांबद्दल माहिती देतांना ते बोलत होते. माजी शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात व संस्थेचे अध्यक्ष आमदार डॉ.सुधीर तांबे यांचे मार्गदर्शनाखाली या महाविद्यालयाने गुणवत्तेतून आपला लौकिक जपला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातही या महाविद्यालयाच्या गुणवत्तेमुळे अग्रक्रम आहे. कला, विज्ञान व वाणिज्य बरोबर तांत्रिक कोर्स, बीबीए, बीसीए हे अभ्यासक्रम ही सुरु असून एमएचे हिंदी व इतिहास हे अभ्यासक्रम, मुक्त विद्यापीठाचे अभ्यासक्रम अशा विविध अभ्यासक्रमात हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

महाविद्यालयाची नवीन अद्यावत व आकर्षक वास्तू सर्वांची लक्ष वेधून घेत आहे. येथील स्वच्छता, विद्यार्थ्यांना दर्जेदार सुविधा, ग्रंथालय यामुळे अनेक विद्यार्थ्यांना त्यांचे करिअर आणि व्यासपीठ मिळत आहे. याच बरोबर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध कार्यशाळांचे यशस्वी आयोजन ही या महाविद्यालयाची जमेची बाजू आहे. मुलींसाठी स्वतंत्र होस्टेल, महिला कक्ष, खेळांची विविध साहित्य,अनुभवी तज्ञ प्राध्यापक या सर्वांच्या बरोबर शिस्त, पारदर्शकता, काटकसर ही सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांची तत्वप्रणाली सातत्याने जपली जात आहे. संस्थेचे सेक्रेटरी चंद्रकांत कडलग, सर्व संचालक याचबरोबर रजिस्ट्रार बाबुराव गवांदे हे ही सातत्याने देख रेख, विविध उपक्रमांना प्रोत्साहन देवून महाविद्यालयाच्या गुणवत्तेचा आढावा घेत आहेत. नवीन इमारत, नवीन सुविधा, सातत्याने विविध उपक्रमांचे आयोजन यामुळे हे महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी मोलाचे ठरत असल्याचे प्रा.शिवाजी नवले, प्रा.बाळासाहेब वाघ, प्रा.सुहास आव्हाड व इतर प्राध्यापकांनी म्हंटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)