गुणवत्ता विकास अभियानाचे आजपासून मुल्यांकन

खटाव तालुक्‍याच्या अनोख्या शैक्षणिक पॅटर्नमुळे विद्यार्थ्यांसह शिक्षकही चार्ज

प्रकाश राजेघाटगे

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बुध – कटगुण, ता. खटाव येथे म. फुले पुण्यतिथीदिवशी पं. स. सभापती सौ. कल्पना मोरे, उपसभापती संतोष साळुंखे यांच्या प्रेरणेतून व जि. प. अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते म. फुले शैक्षणिक गुणवत्ता विकास अभियानाचा प्रारंभ करण्यात आले होते. प्रेरणा व प्रोत्साहनातून वास्तववादी व वस्तुनिष्ठ मुल्याकंनावर आधारीत या शैक्षणिक प्रकल्पाच्या मुल्यांकनास आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीपासून प्रारंभ होत आहे. दरम्यान, खटावचा हा शैक्षणिक पॅटर्नला जिल्ह्यात नावाजले जात आहे.

याबाबत माहिती देताना प्रयोगशील गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे म्हणाले, खटाव तालुक्‍यातील जिल्हा परिषद शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी शिक्षकांनी स्वयमंप्रेरणेने जिद्दीने विविध शैक्षणिक उपक्रम, प्रकल्प, प्रयोग, संशोधन, कृतिकार्यक्रम करावेत. त्यासाठी त्यांना प्रेरणा व प्रोत्साहन देणारा शैक्षणिक कार्यक्रम महात्मा फुले शैक्षणिक गुणवत्ता विकास अभियानातून दिलेला आहे. या शैक्षणिक अभियानात शिक्षकांनी केंद्रप्रमुखांचे मार्गदर्शन घेऊन विविध शैक्षणिक उपक्रम व कार्यक्रम वर्ग व शाळा पातळीवर राबवत आहेत.

वाचन लेखन व अंकज्ञान बरोबर शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, सैनिक शाळा प्रवेश परीक्षा तयारी व सराव वर्ग सुरू आहेत. यशवंतराव चव्हाण विद्यार्थी व्यक्तीमहत्व विकास स्पर्धा अंतर्गत भाषण स्पर्धा, निबंध स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, हस्तलिखित स्पर्धा, प्रश्‍नमंजुषा स्पर्धा, गीतमंच, लोकनृत्य स्पर्धा, शाहिरी पोवाडा स्पर्धा, बालनाट्यस्पर्धा तयारी वर्ग शाळा केंद्र बीट तालुका पातळीवर सुरू आहे. या विविध शैक्षणिक विकास कार्यक्रमामुळे खटाव तालुक्‍यातील शैक्षणिक वातावरण शिक्षणमय झाले असून शिक्षकांना अधिकारी पदाधिकारी व समाज प्रेरणा देत असलेने शिक्षक व विद्यार्थी उमेद व आशावादी पध्दतीने विविध शैक्षणिक प्रयोग करुन शैक्षणिक कामकाज दर्जेदारपणे करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहेत.

असे होईल मुल्यमापन
प्रकल्प मुल्याकंनात खटाव तालुक्‍यातील जिल्हा परिषदेच्या 247 शाळांचा समावेश होत आहे. इयत्ता 1 ते 4 थी मधील वर्गांचे मुल्यांकन 100 गुणांचे असून प्रथमस्तर केंद्रपातळीवर मुल्यमापन करून प्रत्येक केंद्रातील इयत्ता पहिलीचे तीन, इयत्ता दुसरीचे तीन, इयत्ता तिसरीचे तीन व इयत्ता चौथीचे तीन क्रमांक गुणानुक्रमे काढण्यात येतील. मुल्यमापनासाठी केंद्रातील इयत्तानिहाय फक्त प्रथम क्रमांकप्राप्त एकच वर्ग पात्र असेल.

तालुका मुल्यमापनासाठी पहिली ते चौथीपर्यंतचे एकवीस केंद्रातील प्रतिइयत्ता प्रथम क्रमांक विजेते एकविस वर्ग पात्र असतील. त्याचे पुन्हा अंतीम फेरीत मुल्यमापन करुन इयत्तानिहाय तालुका पातळीवर प्रथम, व्दितीय व तृतीय असे तीन क्रमांक काढण्यात येतील. तालुका पातळीवरील इयत्ता निहाय प्रथम तीन क्रमांक विजेते वर्गशिक्षकांना रोख रक्कम, मानचिन्ह, सन्मानपत्र देऊन त्यांचा महाराष्ट्र दिनी सत्कार करण्यात येणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)