गुणवत्ता वाढीसाठी संगणकीय ज्ञान गरजेचे : अभयासिंह राजेघाटगे

बुध येथे उद्‌घाटन करताना सरपंच अभयासिंह राजेघाटगे शेजारी पोपट जाधव, व इतर (छाया : प्रकाश राजेघाटगे)

बुध, दि. 29 (प्रतिनिधी) – विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व तांत्रिक गुणवत्ता वाढीसाठी संगणकीय ज्ञान गरजेचे बनले असून’ भविष्यातील आव्हाने ओळखून योग्य ती पावले उचलली तर ग्रामीण भागातील मुले जगाच्या स्पर्धत कुठेही कमी पडणार नाहीत, असा विश्वास बुधचे सरपंच अभयसिंह राजेघाटगे यांनी व्यक्त केला.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ईदगाहमाळ बुध येथे ग्रामपंचायत कार्यालय बुध यांच्यावतीने एक टीव्ही संच व 1 ली ते 4 थी पर्यंत अभ्यासक्रम सॉप्टवेअर दिला. त्याचे उद्‌घाटन सरपंच अभयासिंह राजेघाटगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य पोपट जाधव’ विकास सेवा सोसायटीचे संचालक हरिभाऊ धोंगडे उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी शिक्षक व पालकवर्ग विविध शैक्षणिक उपक्रम राबवत असून, या उपक्रमांना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य करू अशी ग्वाही राजेघाटगे यांनी दिली. मुख्यध्यापक आनंदराव वीर, शांताराम चव्हाण, महादेव चव्हाण, शिवाजी मदने, दत्ताञय जाधव, कुमार जाधव, सचिन चव्हाण, चंद्रकांत चव्हाण, हणमंतराव जाधव, सुरेश चव्हाण, विठ्ठलराव जाधव, लता जाधव, माया जाधव, प्रिया जाधव, माधुरी चव्हाण, लक्ष्मीबाई मदने, प्राजक्ता सुर्यवंशी आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन आनंदराव वीर यांनी केले. तर आभार उज्वला मोहोट कर यांनी मानले.

 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)