गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच व्यक्‍तिमत्त्व विकास; आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडासंकुल

गुरुकुल पद्घतीने गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आत्मा मालिक शैक्षणिक संकुल, कोकमठाण राज्यभरामध्ये प्रसिद्घ झाले आहे. राज्यभरातून या शैक्षणिक संकुलात हजारो विद्यार्थी प्रवेश घेऊन आपली स्वप्ने पूर्ण करीत आहे. प्राचीन गुरुकुल पद्घती व वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून शिक्षणासाठी अध्यात्मिक पायावर गुरुकुल पद्घतीने ज्ञानमंदिर उभारले आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण, स्पर्धा परीक्षा तयारी, कला, नाट्य, संगीत, क्रीडा, विविध प्रवेश परीक्षांची तयारी अशा वेगवेगळ्या खांबांवर हे शैक्षणिक संकुल (ज्ञानमंदिर) डौलाने उभे आहे.

“जो जे वांछिल तो ते लाहो’ हे ब्रीद घेऊन या शैक्षणिक संकुलाची सुरुवात झाली. इंग्रजी माध्यमाच्या शाळेपासून सुरू झालेल्या या शैक्षणिक संकुलाने पुढे मराठी माध्यम शाळा, सीबीएसई बोर्ड शाळा (इंटरनॅशनल स्कूल), ज्युनिअर कॉलेज, डी.एड्‌. कॉलेज, केंद्रीय व लोकसेवा आयोगांच्या परीक्षांसाठी प्रशिक्षण केंद्र, अभियांत्रिकी कॉलेज अशा माध्यमातून समाज विकासासाठी शिक्षणाचे महत्त्व जाणून शैक्षणिक चळवळ सुरू करण्यामध्ये महत्त्वाचा वाटा उचलला. बदलत्या काळानुसार पारंपरिक शिक्षणाबरोबरच स्पर्धा परीक्षा व प्रवेश परीक्षा यांच्याही शिक्षणाला महत्त्व प्राप्त झाले. म्हणूनच आत्मा मालिक शैक्षणिक संकुलाने पारंपरिक शिक्षणाबरोबरच विविध शिष्यवृत्ती परीक्षा, ऑलिम्पियाड परीक्षा, एनटीएस, एनएनएमएस, इ. परीक्षांच्या तयारीसाठी स्वतंत्र फाउंडेशन (Foundation) वर्ग चालविले. त्यामुळे आत्मा मालिकचे विद्यार्थी विविध परीक्षांच्या गुणवत्ता यादीत चमकत असल्याने आत्मा मालिकने राज्यभरात आपला वेगळा ठसा उमटविला आहे.

शिक्षणाचा खरा अर्थ म्हणजे विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास हा आहे आणि तो सार्थ करण्यासाठी फक्त पारंपरिक शिक्षणावर भर न देता विद्यार्थ्यांमधील कलागुणांचा आविष्कार करण्यासाठी ललित कला अकादमी, स्पोर्टस्‌ अकादमी, क्रिकेट अकादमी, योग स्कूल, संगीत महाविद्यालय, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र असे नवनवीन विभाग सुरू करून विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी व्यासपीठ उभारून दिले आणि त्याबरोबरच गुरुकुल शिक्षण पद्घतीच्या माध्यमातून ध्यान, योग व मूल्याधिष्ठीत शिक्षण पद्घतीचा अवलंब केला. म्हणजेच वैज्ञानिक शिक्षणाबरोबर सुसंस्कारित व चारित्र्यवान नागरिक घडविण्याचे काम हे शैक्षणिक संकुल करत आहे. कारण, विद्यार्थी मूल्य हे पुस्तकातून शिकत नाही तर ती निसर्गातून, सभोवतालच्या वातावरणातून, इतरांच्या अनुकरणातून शिकत असतात आणि हेच अनुकरणीय वातावरण निसर्गरम्य परिसरात वसलेल्या आत्मा मालिक शैक्षणिक संकुलात बघावयास मिळते म्हणूनच येथील विद्यार्थी स्वयंशिस्त व संस्कारक्षम दिसून येतात.

आत्मा मालिक रेसिडेन्शिअल करिअर ऍकॅडमीच्या माध्यमातून 2012 मध्ये केंद्रीय व राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षांतून प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन केंद्र सुरू केले. या केंद्रातून आजपर्यंत जवळपास 150 विद्यार्थ्यांची विविध शासकीय पदावर निवड झाली आहे. प्रशासकीय सेवेतून ते आपले देशसेवा करत आहे. 2017 पासून या ऍकॅडमीतर्फे अभियांत्रिकी (इंजिनिअरिंग) व वैद्यकीय (मेडिकल) या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भारतातील सर्वोत्कृष्ट आकाश कोचिंग इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून नीट (NEET) व जेईई (JEE Main, Advance) या प्रवेश परीक्षांची तयारी सुरू करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिली. यामुळे होतकरू व हुशार विद्यार्थ्यांना अत्यल्प खर्चात या परीक्षांची तयारी करण्याची संधी मिळाली.

शैक्षणिक वर्ष 2018-19 इयत्ता 11 वी सीबीएसई व स्टेट बोर्डबरोबरच अभियांत्रिकी (IIT) व वैद्यकीय (NEET) या प्रवेश परीक्षांच्या कोचिंगसह नवीन बॅच दिनांक 10 एप्रिल 2018 पासून सुरू होत आहे. आकाश कोचिंग इन्स्टिट्यूटचे तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक NEET आणि JEE या परीक्षांचे मार्गदर्शन करतात. आकाश कोचिंग इन्स्टिट्यूटचे दर्जेदार स्टडी मटेरिअल, परीक्षा पॅटर्न व आय ट्यूटर लॅबमुळे विद्यार्थी करिअरचे शिखर निश्‍चितच गाठतील.
गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग आणि मेडिकलचे स्वप्न साकार करता यावे या उद्देशाने संस्थेने रक्कम रुपये 51 लाखांची स्कॉलरशिप देण्याचे जाहीर केले आहे. या स्कॉलरशिपसाठी पात्रता परीक्षा दि. 15 एप्रिल 2018 रोजी घेतली जाणार आहे. या स्कॉलरशिप परीक्षेसाठी फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून विद्यार्थी www.atmamalikedubation.in या संकेतस्थळावर अथवा कार्यालयात प्रत्यक्ष संपर्क साधून फॉर्म भरू शकतात. तसेच 8669600700, 7588694082 या क्रमांकावर संपर्क साधावा.

त्याचबरोबर शैक्षणिक वर्ष 2018 पासून आत्मा मालिकने आणखी एक पुढचे पाऊल टाकत आपली सामाजिक बांधिलकी जपत देशसेवेचे व्रत उरी बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचे स्वप्नपूर्तीची गरुडझेप घेता यावी, या उद्देशाने एन.डी.ए. (NDA) ऍकॅडमीची स्थापना केली. या ऍकॅडमीच्या माध्यमातून लष्करामध्ये अधिकारी होण्याची दुर्दम्य इच्छा बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पंखांना बळ देण्याचे काम केले जाणार आहे. अनेक पालकांना आपल्या पाल्याला एन.डी.ए.मध्ये पाठवायचे असते. मात्र, योग्य माहितीचा अभाव व भरमसाठ फी यामुळे आपल्या पाल्याची इच्छा त्यांना पूर्ण करता येत नाही. म्हणूनच विश्‍वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टने आत्मा मालिक एनडीए ऍकॅडमीच्या माध्यमातून पालकांना विश्‍वासार्ह व सशक्त पर्याय दिला आहे. सीबीएसई माध्यमाच्या 11 वी व 12 वीच्या शिक्षणाबरोबरच अनुभवी पांडे ब्रदर्स यांच्या मार्गदर्शनाखाली एनडीएचे धडे गिरविले जाणार आहेत.

आत्मा मालिक एनडीए ऍकॅडमीमार्फत एनडीए प्रवेश परीक्षांच्या मार्गदर्शनाबरोबरच आवश्‍यक सर्व सोईसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. यामध्ये अनुभवी प्राध्यापक वृंद, डिजिटल तसेच वातानुकूलित वर्ग, इंटरनॅशनल दर्जाच्या प्रयोगशाळा, 24 वातानुकूलित अभ्यासिका, सुसज्ज ग्रंथालय, एसएसबी (सर्व्हिसेस सिलेक्‍शन बोर्ड) मार्फत घेतल्या जाणाऱ्या मुलाखत तयारी, शारीरिक तंदुरुस्ती तसेच सामाजिक व मानसिक विकासासाठी विविध खेळाबरोबरच रायफल शुटिंग रेंज, त्याचप्रमाणे दोन माजी कर्नल यांचे पूर्णवेळ मार्गदर्शन उपलब्ध असणार आहे. एकंदरीत विचार करता आत्मा मालिकने एनडीए ऍकॅडमीच्या माध्यमातून उपलब्ध केलेल्या संधीचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. आत्मा मालिक एनडीए ऍकॅडमीमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रवेश पात्रता परीक्षा रविवार, दि. 1 एप्रिल 2018 रोजी सकाळी 11.00 वा. आयोजित करण्यात आलेली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी कार्यालयात संपर्क साधून अथवा www.atmamalikedubation.in या संकेतस्थळाला भेट देऊन अर्ज करावे. अधिक माहितीसाठी 7721994411/721006644/9579092886 या क्रमांकावर संपर्क साधावा.

 

नंदकुमार सूर्यवंशी
अध्यक्ष, विश्‍वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट, कोकमठाण.

शब्दांकनः शंकर दुपारगुडे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)