गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे उद्दिष्ट ठेवा

वाई ः मार्गदर्शन करताना राजेश क्षीरसागर शेजारी कमलाकांत म्हेत्रे, विजय येवले, रविंद्र शिंदे आदी.

शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांचे आवाहन
वाई, दि. 22 (प्रतिनिधी) – नव्या जबाबदाऱ्या, नवी आव्हाने स्विकारून शिक्षण शासन गतिमान व गुणवत्तापूर्ण करूया, असे आवाहन सातारा जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजेश क्षीरसागर यांनी केले.
येथील सुरभी कॉम्प्युटर्स व इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ फॅसिलिटेशन यांच्यावतीने माध्यमिक शाळा मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख यांच्यासाठी आयोजित कार्यशाळेचा समारोप करताना शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर बोलत होते. गट शिक्षणाधिकारी कमलाकांत म्हेत्रे, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे विद्या सचिव विजय येवले, तालुका माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष रवींद्र शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
राजेश क्षीरसागर म्हणाले, जीवन जगण्यास नागरिकांना समर्थ बनविणे, हा शिक्षणाचा हेतू आहे. त्यामुळे बदलती धोरणे, नवनवीन शासन आदेश व कामांचा व्याप वाढतो आहे. तरीही गुणवत्तापूर्ण शिक्षण व लोकाभिमुख प्रशासन देण्याचा कसोशीने प्रयत्न केल्यास यश निश्‍चितत मिळते. त्यासाठी आवश्‍यक तेथे तंत्रज्ञान व कामसू सहकाऱ्यांची मदत घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
सुरभि कॉम्प्युटर्सच्या स्वाती हेरकळ यांनी दर पंधरा मिनिटांनी नवीन शासन परिपत्रक मुख्याध्यापकांसाठी सोशल मीडियावरुन येते. अशा आव्हानात्मक जबाबदाऱ्या मुख्याध्यापकांना सुलभ कशा करता येतील, हे स्पष्ट करण्यासाठी व शिक्षण व्यवस्थेत सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन असल्याचे प्रास्ताविकात सांगितले.
कार्यशाळेत असोसिएशनचे रवी बाविस्कर, वसुधा लाल व शलाका गुंडी यांनी प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. मुख्याध्यापकांच्यावतीने सौ. संगीता जाधव, अनिल सपकाळ, विठ्ठल माने यांनी मनोगत व्यक्त केले. सौ. अमृता शिवदे यांनी आभार मानले.

 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)