गुणवंत विद्यार्थी हीच समाजाची संपत्ती ः म्हेत्रे

परखंदी ः वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करण्यात आले.

परखंदी हायस्कूलमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ
वाई, दि. 29 (प्रतिनिधी) – विविध शैक्षणिक क्षेत्रात नावलौकिक मिळवणारे विद्यार्थी हीच समाजाची खरी संपत्ती असते. हा वारसा जपायला हवा, असे मत वाईचे गटशिक्षणाधिकारी म्हेत्रे यांनी परखंदी येथे व्यक्‍त केले.
परखंदी हायस्कूलमध्ये नुकताच गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ झाला. या कार्यक्रमात इ. 10 वी सह इतर वर्गातील गुणवंत विद्यार्थी व पालकांचा गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पश्‍चिम भागाचे लोकनेते व कृष्णाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बापूसाहेब शिंदे उपस्थित होते. यावेळी अध्यक्ष सतनसिंह शिंदे, सचिव सुरेश देशमाने, पंचायत समिती सदस्य सौ. ऋतुजाताई शिंदे, दिपक ननावरे, पसरणीचे पोलीस पाटील संदीप प्रभाळे, खरे, जगन्नाथ सावंत सर, तसेच सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ उपस्थित होते.
युवा नेते विराज शिंदे यांनी स्वागत केले. विजय भोईटे यांनी सूत्रसंचालन केले. सौ. प्रतिभा भांडवलकर यांनी यादीवाचन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक प्रसाद यादव, उपशिक्षक पोपट जाधव, शरद गायकवाड, उमेश शिंदे, महेश महांगडे, श्रीमती रेखा गायकवाड, श्रीमती सुरेखा एरंडे यांनी परिश्रम घेतले. गोपाळराव महांगडे यांनी आभार मानले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)