गुणवंत मुख्याध्यापक पुरस्काराने तोत्रे सन्मानित

चिंबळी- मोई (ता. खेड) येथील इंदिराजी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापका नवनाथ तोत्रे यांना खेड तालुका पंचायत समिती व शिक्षण विभागाच्या वतीने गुणवंत मुख्याध्यापक पुरस्काराने गौरविण्यात आले. आमदार सुरेश गोरे व इतर मान्यवरांच्या हस्ते तोत्रे यांना राजगुरूनगर येथे गौरविण्यात आले. याप्रसंगी सभापती सुभद्रा शिंदे, सदस्य अमर कांबळे, गटशिक्षिण अधिकारी संजय नाईकडे, गटविकास अधिकारी इंदिरा आस्वार आदि मान्यवर उपस्थित. दरम्यान, तोत्रे यांना गुणवंत मुख्याध्यापक पुरस्काराने गैरविण्यात आल्याने संस्थापक अध्यक्ष तुकाराम गवारे, शहाजी कर्पे, सरपंच अरूण फलके, एकनाथ कर्पे, भगवान साकोरे, रवी गवारे व सर्व ग्रामस्थांच्या वतीने अभिनंद केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)