गुढी पाडव्यानिमित्त लोणावळेकरांना खास सुरांची सुरेख मेजवानी

लोणावळा, (वार्ताहर) – गुढीपाडवा व हिंदू नववर्षाच्या स्वागतानिमित्त लोणावळ्यात सद्गुरू संगीत सदनच्या वतीने आठवणीतील गाणी या संगीतमय सुरांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. ओमकार हॉस्पिटॅलिटीचे शरद कुलकर्णी, लोणावळा शिक्षण मंडळाचे माजी सभापती विनय विद्वांस, डॉ. हिरालाल खंडेलवाल, राजेश मेहता, नाना बोरासकर, महेश खराडे, रामविलास खंडेलवाल आदी उपस्थित होते.

“जय शारदे वाघेश्‍वरी’ गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. तद्नंतर मी राधिका, राम का गुणगाण, गुणी बाळ असा ही गीते मोनिका काकडे यांनी, तर मराठी पाऊल पडते पुढे, पाहिले ना मी तुला, राधा ही बावरी ही गीते प्रवीण देशमुख यांनी सादर केली. भगवान दमेडे यांनी अबिर गुलाल, कानडा राजा पंढरीचा ही गीते सादर केली. त्यांना मनोज कदम यांनी तबला, गिरीश बापट सियेसायझर, एजाज खान व्हॉयोलिन, भूषण शेळके बासरी, अनिकेत गिरी ऑक्‍टोपॅड, संदीप वर्मा, आयुष कुलकर्णी, उत्कर्ष नेमाणे यांनी साईड रिदम वाद्यांनी साथ दिली. सूत्रसंचालन बापुलाल तारे व सुरेश गायकवाड यांनी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)