गुड फ्रायडे निमित्त ख्रिस्ती बांधवांची प्रार्थना

देहुरोड – झेंडेमळा येथील सेव्हंथ डे ऍडव्हेंटिस्ट चर्चमध्ये गुड फ्रायडे निमित्त प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते. हे बाप्पा, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो. प्रभू येशुने वधस्तंभावर बलिदान देताना काढलेल्या उदगार, वचन, बोधपर संदेशांचे यावेळी स्मरण करण्यात आले.

रेव्ह. डॉ.सुनिल साठे यांनी प्रवचनातून सांगितले की, पाप व आज्ञाभंग यामुळे देवाच्या समक्षतः सान्निध्यापासून दुरावलेल्या अखिल मानवजातीला तारण, पापक्षमा मिळून त्यांचा देवाशी समेट व्हावा यासाठी प्रभू येशुने वधस्तंभावर आपले बलिदान दिले.

चुकीच्या रुढी, परंपरा, कर्मकांडाच्या नावाखाली सामान्य लोकांची होणारी पिळवणूक व फसवणूक यातून लोकांची सुटका करुन शुद्ध उपासनेचा मार्ग व प्रार्थना जीवनाचे महत्त्व प्रभू येशुने आपल्या समर्पित, त्यागमय, पवित्र जीवनातून व अनमोल अशा बलिदानातून स्पष्ट केले. गुड फ्रायडेच्या पवित्र दिवशी प्रभू येशुच्या बलिदानाचे स्मरण करीत न आवडणारी कामे वधस्तंभावर खिळून नष्ट केली पाहिजेत. प्रभु त्या आज्ञांचे पालन करुन शुद्ध व पवित्र जीवन जगले पाहिजे हाच गुडफ्रायडेचा मुख्य संदेश आहे. पास्टर सदानंद भोरे यांनीही प्रभू येशूच्या बलिदानाचे व वधस्तंभावरील उदगारांचे महत्त्व सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)