गुडघे प्रत्यारोपणासाठी “वायसीएम’चा आधार

पिंपरी – गुडघेदुखीने त्रस्त असलेल्या गोरगरीब रुग्णांसाठी महापालिकेचे वायसीएम रुग्णालय वरदान ठरत आहे. खासगी रुग्णालयात लाखो रुपये खर्चून होणाऱ्या या शस्त्रक्रियेसाठी प्रत्यारोपण साहित्य वगळता अन्य कोणताही खर्च करावा लागत नसल्याने अनेक गरजू रुग्ण आपल्या पायावर “उभे’ आहेत.

गोरगरीबांचे रुग्णालय असे संबोधले जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएमएच) उपचारासाठी राज्यभरातून रुग्ण येत असतात. सातशे खाटांच्या रुग्णालयाला मनुष्यबळाच्या अभावाचा मोठा फटका सहन करावा लागतो. रुग्णालयात शस्त्रक्रिया व दुबिर्णीव्दारे गुडघाप्रत्यारोपणाची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.

2014 मध्ये 14 रुग्णांच्या गुडघ्याचे प्रत्यारोपण करण्यात आले. मात्र, त्यानंतर अस्थिरोग तज्ज्ञ व मनुष्यबळाच्या अभावी शस्त्रक्रियांची संख्या घटली. 2015 मध्ये 5, 2016 मध्ये 1, 2017 मध्ये 4 तर मागील आठ महिन्यात 4 रुग्णांच्या गुडघ्याचे प्रत्यारोपण झाले. गुडघेदुखी ग्रस्त रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता रुग्णालय प्रशासनाने हा विभाग पुर्ण क्षमतेने पुर्ववत सुरु केला आहे.

ज्येष्ठ नागरिकांमध्ये गुडघेदुखीची समस्या हा गंभीर विषय आहे. गुडघ्यामध्ये असणारी झीज ही अंतिम टप्प्यातील असल्यामुळे अशा रुग्णांना सांधेरोपणाच्या शस्त्रक्रिया करुन त्यांच्या वेदनामुक्त करणे रामबाम उपाय ठरत आहे. अपघातामुळेही अनेकांना कमी वयातच या शस्त्रक्रियेला सामोरे जावे लागते. गुडघा प्रत्यारोपणासाठी खासगी रुग्णालयात लाखो रुपये मोजावे लागतात. मात्र, अवघ्या काही हजारांमध्ये वायसीएम रुग्णालयात हे उपचार होतात. प्रत्यारोपणासाठी आवश्‍यक साहित्य रुग्णांना बाहेरुन आणावे लागते. गरजू रुग्णांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन रुग्णालय प्रशासनाने केले आहे.

सुमारे 70 टक्‍के ज्येष्ठांना गुडघेदुखीचा त्रास जाणवत असतो. अशा रुग्णांना सांधेरोपणाच्या शस्त्रक्रिया करुन त्यांना वेदनामुक्त करणे फायदेशीर ठरते. त्यादृष्टीने अस्थिरोग व शस्त्रक्रिया विभाग आता पुर्ण कार्यक्षमतेने सुरु करण्यात आला आहे. वायसीएम रुग्णालयात खुबा, गुडघ्याचे यशस्वीपणे प्रत्यारोपण केले जाते. अल्यल्प खर्च त्यावर होतो. गरजू रुग्णांनी त्याचा लाभ घ्यावा.
– डॉ. शंकर जाधव, उपअधिक्षक, वायसीएम रुग्णालय.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)